नवी दिल्लीः केंद्र सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. यानंतर चीनकडून करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशभरात करण्यात आला असून इंटेलिजन्स एजन्सीकडून मॉनिटरिंग अधिक वेगवान करण्यात आली आहे. सायबर सिक्योरिटी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, ही केवळ सुरूवात आहे. त्यामुळे चीन संतापला असून सूड घेण्याच्या भावनेने इंडियन सायबर स्पेसला नुकसान पोहोचवण्यासाठी जरूर प्रयत्न करेल, असे तज्ज्ञांना वाटते आहे.

वाचाः

सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, जवळपास सर्वच सेक्टरमध्ये आधीच्या तुलनेत जास्त मॉनिटरिंग केली जात आहे. तसेच पॉवर, टेलिकॉम आणि फायनाशिंयल सर्विसेज संबंधीत सेक्टरला चायनीज इन्फ्रास्ट्रक्चरला जोडले असल्या कारणाने अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक वर्षापासून आम्ही चीनच्या क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे त्या नेटवर्क्सपर्यंत चीन पोहोचला आहे. यात कम्युनिकेशन्स, पॉवर शिवाय फायनाशिंयल सेक्टरचा समावेश आहे.

सर्विलांस करीत आहे सरकार
रिमोट लोकेशन्सने चीन भारताच्या या नेटवर्क्सवर सायबर अटॅक करु शकतो. त्यामुळे अलर्ट राहण्यास सांगितले आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, सरकार त्या कंपन्यांवर फोकस करीत आहे. चीनी गुंतवणूकदारांकडून फंडिंग करण्यात आली आहे. याची मॉनिटरिंग आणि सर्विलान्स वेगवेगळ्या स्तरांवर केले जाईल. तसेच सरकारी आणि खासगी सेक्टरमध्ये वापर करीत असलेल्या चीनमधील बनवलेल्या सर्विलान्स डिव्हाईस सुद्धा रडारवर आहे.

वाचाः

सायबर स्पेसवर अटॅक
PwC India च्या लीडर सायबर सिक्योरिटी सिद्धार्थ विश्वनाथने म्हटले आहे की, सध्या इकॉनॉमिक सिच्युएशन मध्ये कोणत्याही सीमेवर युद्धासाठी तयार नाही. अशात सायबर स्पेस, ट्रेड आणि सप्लाय चेन ला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. चीनकडून फंडिंगच्या कंपन्या आणि खास करुन टेक फर्म्सची आता पर्यंत सर्वात जास्त देखरेख केली जात आहे. कारण, सहज याला लक्ष्य केले जावू शकते. आधीही चायनीज हॅकर्सशी संबंधित वॉर्निंग्स सरकारकडून देण्यात आली आहे.

अलर्ट राहणे गरजेचे
चीनकडून आधीही डेटा मायनिंगसाठी अटॅक केला जावू शकतो. गेल्या काही वर्षात भारतीयांचा मेडिकल डेटा चोरी झाल्याचे समोर आले होते. The Dialogue चे संचालक काझीम रिझवी यांनी म्हटले की अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा यासाठी घेतला आहे. चीनकडून दबाव वाढू नये यासाठीही स्ट्रॅटिजी बनवून काम करणे आणि अशा अटॅक्सवर अलर्ट राहणे गरजेचे आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here