Xiaomi 11T Pro 5G वर मिळणारी ऑफर्स

Xiaomi 11T Pro 5G चे बेस व्हेरियंट म्हणजेच ८ जीबी रॅम सोबत 128GB स्टोरेजच्या मॉडलला ३४ हजार ९९९ रुपये किंमतीत अमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजला ३६ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजला ३८ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना हा फोन २८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.
वाचाः Budget Smartphones आणखी स्वस्तात खरेदीची संधी, या कंपनीच्या फोन्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट
Xiaomi 11T Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 11T Pro 5G मध्ये अँड्रॉयड ११ आधारित MIUI 12.5 दिले आहे. यात ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासोबत डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळतो. डिस्प्लेवर गोरिला ग्लास व्हिक्टसचा सपोर्ट मिळेल. डिस्प्लेची ब्राइटनेस १००० निट्स आहे. यात स्नॅपड्रॅग ८८८ प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU, 12 जीबी पर्यंत रॅम आणि ३ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल.
वाचाः उद्यापासून वनप्लसचा दिवाळी सेल, १९ हजाराचा स्मार्ट टीव्ही ९ हजार ४९९ रुपयात मिळणार
Xiaomi 11T Pro 5G चा कॅमेरा

Xiaomi 11T Pro 5G मध्ये तीन रियर कॅमेरा आहे. प्रायमरी लेन्स १०८ मेगापिक्सलचा सॅमसंग HM2 सेंसर दिले आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. फोन सोबत ५० मेगापिक्सलचा डायरेक्टर मोड मिळणार आहे. फोनच्या कॅमेराने ८ के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता येते. फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
वाचाः Budget Smartphones आणखी स्वस्तात खरेदीची संधी, या कंपनीच्या फोन्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट
Xiaomi 11T Pro 5G ची बॅटरी

शाओमीच्या या फोन मध्ये कनेक्टिविटी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ, GPS/A-GPS/NavIC, NFC, IR ब्लास्टर आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट दिले आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. फोन मध्ये 5000mAh ची डुअल सेल बॅटरी दिली आहे. जी 120W च्या HyperCharge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फक्त १७ मिनिटात ही बॅटरी फुल चार्ज होते.
वाचाः आयफोनच्या चार मॉडलपैकी ‘या’ दोन मॉडलमध्ये येतेय ही समस्या, यूजर्सकडून तक्रारीचा पाऊस
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times