Smartphone Offers: तुम्ही तुमच्यासाठी क्लासवन स्मार्टफोन शोधत असाल, ज्यामध्ये टॉप फीचर्स मिळतील. तर, तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. Amazon चा सर्वात मोठा सेल Amazon Great Indian Festival Sale 2022 २३ सप्टेंबरपासून ग्राहकांच्या भेटीला येत आहे. त्याच वेळी, प्राइम सदस्य एक दिवस आधी म्हणजे २२ सप्टेंबरपासून या सेलचा लाभ घेऊ शकतील. Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हलच्या आधी, स्मार्टफोन्सवर अनेक प्री-सेल डील आणि ऑफर्स उपलब्ध आहेत. या काळात स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज ४० टक्के डिस्काउंटसह खरेदी करता येतील. ज्यात OnePlus, Xiaomi, Oppo आणि Samsung सारख्या कंपन्यांचे स्मार्टफोन समाविष्ट आहेत. यात ई-कॉमर्स साइटने सवलतीच्या फायनान्ससाठी SBI बँकेसोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे तुम्हाला SBI बँक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर १० % इन्संट सूट मिळेल. यादरम्यान एक्सचेंज ऑफरचा लाभही उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S22

samsung-galaxy-s22

Samsung Galaxy S22 5G : सॅमसंगचे फॅन असाल तर Samsung Galaxy S22 5G वरील ऑफर खास तुमच्यासाठीच आहे. या फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट ८५,९९९ रुपयांऐवजी ६२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यावर २३,९९९ रुपयांची सूट दिली जात आहे. सर्व बँक कार्डांवर ५००० रुपयांची फ्लॅट इन्स्टंट सूट दिली जाईल. त्याच वेळी, फोन EMI अंतर्गत देखील खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला दरमहा ३०१० रुपये द्यावे लागतील. तसेच, १४,३०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल.

वाचा: Flipkart Big Billion days Sale मध्ये Vivo, Xiaomi सह ‘या’ डिव्हाइसेसवर बंपर ऑफ, पाहा डिटेल्स

Oppo F21s Pro

oppo-f21s-pro

Oppo F21s Pro: या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २७,९०० रुपये आहे.पण, १९ टक्के सूटसह Oppo F21s Pro तुम्हाला २२,५५९ रुपयांना खरेदी करता येईल. EMI अंतर्गत, दरमहा १०७८ रुपये देऊन Oppo F21s Pro फोन खरेदी करता येईल. त्याच वेळी,१६,३००. रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. ICICI बँक कार्ड्सवर १२५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.Oppo चे स्मार्टफोन्स तुम्हाला आवडत असतील तर हा फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा: Samsung स्मार्टफोनवर १३ हजार रुपयांपर्यंत सूट, २० हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार १०८ MP कॅमेरा

​Xiaomi 11 Lite NE 5G

xiaomi-11-lite-ne-5g

Xiaomi 11 Lite NE 5G: Xiaomi 11 Lite NE 5G जबरदस्त फीचर्सने परिपूर्ण आहे. फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज २५,९९९ रुपयांना ८००० रुपयांच्या सवलतीसह खरेदी करता येईल. Xiaomi 11 Lite NE 5G ची MRP ३३,९९९ रुपये आहे. यासोबतच EMI ऑप्शन देखील दिला जात आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला फोन खरेदी करण्यासाठी दरमहा १२४२ रुपये द्यावे लागतील. तसेच, सर्व बँक कार्डांवर त्वरित सूट दिली जाईल. जी ५००० रुपये आहे. यासोबतच १९,३०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही Xiaomi 11 Lite NE 5G च्या खरेदीवर तुम्ही मिळवू शकता.

वाचा :२८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येणाऱ्या या Jio Plans बद्दल माहितेय ? सुरुवातीची किंमत ९१ रुपये

One plus 10T

one-plus-10t

One Plus 10T 5G: One Plus 10T 5G हा एक जबर्दत स्मार्टफोन आहे . जो अनेक स्मार्टफोन युजर्सच्या विशलिस्टमध्ये आहे. या फोनचा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट ४९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याच वेळी, फोन EMI अंतर्गत देखील OnePlus 10T 5G खरेदी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला दरमहा २३८९ रुपये द्यावे लागतील. याशिवाय १९,३०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जाईल. अॅक्सिस बँकेच्या कार्डांवर ५००० रुपयांची फ्लॅट इन्स्टंट सूट दिली जाईल.

Xiaomi 12 Pro

xiaomi-12-pro

Xiaomi 12 Pro: Xiaomi 12 Pro चा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट २१ टक्के सूटसह ६६,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. त्याची MRP ८४,९९९ रुपये आहे. यासोबत ईएमआयचा पर्यायही दिला जात आहे. या पर्यायाअंतर्गत फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला दरमहा ३,२०१ रुपये द्यावे लागतील. तसेच, सर्व बँक कार्डांवर ८००० रुपयांची त्वरित सूट दिली जाईल. यासोबतच १४,३०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही Xiaomi 12 Pro दिली जाईल.Xiaomi 12 Pro खरेदी करायचा असल्यास ही डील मिस करू नका.

वाचा:Facebook वापरताना ‘या’ चुका पडतील महागात, अडकू शकता कायद्याच्या कचाट्यात

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here