नवी दिल्लीः टेक कंपनी वनप्लसचा लेटेस्ट फ्लॅगशीप सीरिजची बंपर डिमांड मार्केटमध्ये दिसायला मिळत आहे. त्यामुळेच एकानंतर एका फ्लॅश सेल असूनही अनेक ग्राहक फ्लॅश सेल असूनही हा फोन खरेदी करू शकले नाही. जर तुम्ही सुद्धा यापैकी एक असाल तर आज खरेदी करण्याची संधी आहे. या सीरिजचा OnePlus 8 आता ओपन सेलमध्ये खरेदी करता येवू शकतो. परंतु, प्रो मॉडलची फ्लॅश सेल होत आहे.

वाचाः

किंमत आणि सेल ऑफर्स
OnePlus 8 Pro ला आज सेलमध्ये अॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येणार आहे. या फोनचा सेल आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. यात तीन कलर पर्यायात ग्लेशियल ग्रीन, ऑनेक्स ब्लॅक आणि अल्ट्रामरीन ब्लू मध्ये खरेदी करता येवू शकतो. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. तर १२ जीबी प्लस १२८ जीबी मॉडल ची किंमत भारतात ५९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो.

वाचाः

सेल ऑफर्समध्ये ग्राहकांना अॅमेझॉन पे वरून पेमेंट केल्यानंतर १ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच जवळपास ६ हजार रुपयांचे बेनिफिट्स आणि नो कॉस्ट ईएमआयचा फायदा सुद्धा १२ महिन्यांपर्यंत घेता येवू शकतो. वनप्लसच्या साईटवर जिओ बेनिफिट्स ऑफर्स दिसत आहेत.

OnePlus 8 Pro चे वैशिष्ट्ये
स्मार्टफोनमध्ये 3168×1440 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.७८ इंचाचा QHD+ फ्लूइड AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले १२० एचझेड रिफ्रेश रेटसोबत येतो. कर्व्ड सुद्धा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये ड्रॅगन ८६५ एसओसी प्रोसेसर दिला आहे. तसेच १२ जीबी पर्यंत LPDDR 5 RAM मिळते. यात १२८ जीबी आणि २५६ जीबी च्या पर्यायात UFS 3.0 स्टोरेज देण्यात आला आहे.

वाचाः

या फोनमध्ये कॅमेरा सेटअप रियर पॅनेलवर ४८ मेगापिक्सलचे दोन कॅमेऱ्यासोबत एक ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो आणि ५ मेगापिक्सलचा कलर फिल्टर कॅमेरा सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो Sony IMX471 लेन्स सोबत येतो. लांब बॅकअप साठी डिव्हाईसमध्ये 4,510mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये वायरलेस टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here