नवी दिल्लीः विवोने आपला S1 Pro स्मार्टफोन ची किंमत कमी केली आहे. या फोनच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केल्यानंतर या फोनची किंमत आता १९ हजार ९९० रुपये झाली आहे. याआधी या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये होती. कंपनीने या फोनला जानेवारीत लाँच केले होते. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले यासारखे फीचर्स मिळतात. या फोनची थेट टक्कर , , आणि Oppo F15 या फोनशी होते आहे.

वाचाः

याआधीही किंमत कमी झाली होती
नवीन किंमतीची माहिती मुंबईतील महेश टेलिकॉमच्या मनीष खत्री यांनी दिली. या आधी फोनची किंमत एकदा कमी झाली होती. या आधी मार्च महिन्यात या फोनची किंमत १८ हजार ९९० रुपये करण्यात आली होती. एप्रिलमध्ये जीएसटी वाढवल्यानंतर या फोनच्या किंमतीत वाढ केली होती.

वाचाः

चे खास वैशिष्ट्ये
या फोनमध्ये ड्यूल सिम देण्यात आले आहे. या फोनमध्ये ६.३८ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. यात ८ जीबी रॅम आणि क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे लावलेले कॅमेरे डायमंड शेपमध्ये आहे.

वाचाः

रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, दोन मेगापिक्सलचाे सेन्सर मिळतात. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात १२८ जीबीचे स्टोरेज आणि 4,500 mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी 18W ड्यूल-इंजन फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here