नवी दिल्लीः रियलमीचा बजेट स्मार्टफोन चा आज सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरूवात होणार आहे. युजर या फोनला दुपारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट सोबतच रियलमीच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करु शकतील. या फोनची सुरुवातीची किंमत ८,९९९ रुपये आहे. या फोनवर कॅशबॅक आणि तात्काळ डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे.

वाचाः

या ऑफर्स मिळणार
रियलमी नार्जो १०ए दोन व्हेरियंटमध्ये येतो. या फोनचा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ८ हजार ९९९ रुपये आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे.ब्लू आणि व्हाईट कलरच्या ऑप्शनमध्ये या फोनला खरेदी करता येवू शकते. या फोनवर ५ टक्के कॅशबॅक मिळेल. कॅशबॅकसाठी युजर्सला फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक क्रेडिट कार्डवरून शॉपिंग करावी लागेल.

वाचाः

जर तुम्ही अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळेल. फ्लिपकार्टवरून फोन खरेदी केल्यास नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. फोनला रियलमीच्या साईटवरून या फोनला आकर्षक एक्सचेंज्ड ऑफरमध्ये खरेदी करता येवू शकते.

रियलमी नार्जो १०ए चे खास वैशिष्ट्ये
रियलमी नार्जो १०ए अँड्रॉयड १० वर बेस्ड Realme UI सोबत येतो. मीडियाटेक हीलियो G70 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेर्याचा सेटअप दिला आहे. यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेचा फोन मध्ये ५ मेगापिक्सलाचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात स्टँडर्ड चार्जिंग सपोर्ट सोबत 5000mAh ची बॅटरी दिली आहे.फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/A-जीपीएस आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here