नवी दिल्लीः सॅमसंगने नुकतीच 2020 सीरीजची घोषणा केली होती. ची QLED 8K TV सीरीज जगातील पहिली टीव्ही आहे. ज्यात अल्ट्रा थिन फॉर्म फॅक्टर, 8K पिक्चर क्वालिटी आणि सराउंड साउंड ऑडियोचे कॉम्बिनेशन आहे. या सीरीजच्या ६५ इंचाच्या टीव्हीची किंमत ४.९९ लाख रुपये आहे. तर ८५ इंचाचा टीव्हीची किंमत १५ लाख रुपये आहे. सॅमसंगच्या या टीव्ही सीरिजमध्ये युजर्संना जबरदस्त व्ह्यूइंग एक्सपिरियंन्स मिळणार आहे. या अल्ट्रा प्रीमियम टीव्ही खरेदीवर कंपनीकडून कॅशबॅक सह अनेक जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे.

वाचाः

टीव्ही खरेदीवर दोन सॅमसंग गॅलेक्सी S20+ फ्री
सॅमसंग या स्मार्ट टीव्ही रेंजवर जबरदस्त ऑफर घेऊन आली आहे. QLED 8K टीव्ही खरेदीवर ग्राहकांना २ सॅमसंग गॅलेक्सी S20+ फ्री मिळणार आहे. तसेच ग्राहकांना १५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.

वाचाः

९९ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो मिळणार
सॅमसंगच्या या अल्ट्रा प्रीमियम टीव्ही रेंज मध्ये ९९ टक्क्यांपर्यंत स्क्रीन टू बॉडी रेशियो ऑफर केला जात आहे. ज्यात युजर्संना जबरदस्त व्ह्यूइंग मिळेल. हे सर्व टीव्ही इन्फिनिटी स्क्रीनसोबत येते. जबरदस्त साऊंड आऊटपूटसाठी टीव्हीत ऑब्जेक्ट ट्रँकिंग साऊंड (OTS+) आणि अॅक्टिव व्हाईस एम्प्लिफायर (AVA)चा वापर केला आहे.

वाचाः

प्री बुकिंगला सुरुवात
सॅमसंगच्या या टीव्ही रेंजसाठी प्री बुकिंग १ जुलै पासून सुरू करण्यात आली आहे. १० जुलै पर्यंत या स्मार्ट टीव्हीला बुकिंग करता येऊ शकते. बुकिंग कंपनीची अधिकृत वेबसाईट वरून केली जाऊ शकते. याशिवाय, ही टीव्ही सॅमसंग स्मार्ट प्लाझा, लीडिंग कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स स्टोरवर सुद्धा उपलब्ध आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here