नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ कॉलिंगची वाढती क्रेझ पाहून जिओ कंपनीने आपला स्वतः चा एक व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप लाँच केला आहे. गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरसोबत या अॅपला डेस्कटॉप युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. जिओ मीट एचडी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅपवरून एकाचवेळी १०० लोकांसोबत कनेक्ट होता येते.

वाचाः

मल्टी डिव्हाईस लॉगइन सपोर्ट
जिओ मीट अॅपचे युजर इंटरफेस खूप स्वच्छ आहे. हे जवळपास झूम सारखेच आहे. जिओ मीट अॅपमध्ये मल्टी डिव्हाईस लॉगइन सपोर्ट दिला आहे. यात जास्तीत जास्त ५ डिव्हाईस सोबत कनेक्ट करता येते. अॅपमध्ये कॉल दरम्यान एक दुसऱ्याच्या डिव्हाईसला स्विच सुद्धा करता येवू शकते. जिओ मीट मध्ये स्क्रीन शेअरिंग सोबत सेफ ड्राईव्हिंग मोड फीचर सुद्धा मिळते.

वाचाः

गुगल मीट आणि झूमला टक्कर
रिलायन्स जिओ मीट अॅपला गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूमला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आले आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट पंकज पवार यांनी सांगितले की, जिओ मीट अनेक खास फीचर्सचे प्लॅटफॉर्म आहे. हे कोणत्याही डिव्हाईस आणि ऑपरेटिंग सिस्टमवर काम करू शकते. याचे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग अॅप अंतर्गत कोलेबोरेशनसाठी लिमिट नाही.

आरोग्य आणि शिक्षणासाठी खास
जिओने नुकतेच त्यांचा eHealth प्लॅटफॉर्म मीट अॅप सोबत इंटिग्रेटेड आहे. यासाठी युजर व्हर्च्युअली डॉक्टर्ससोबत कनेक्ट करु शकतो. तसेच औषधांची चिठ्ठी घेवू शकतो. यासाठी ऑनलाइन लॅब टेस्ट आणि औषधांची ऑर्डर करू शकता. अॅपमध्ये डॉक्टर्स साठी डिजिटल वेटिंग रुम उपलब्ध आहेत. यात देण्यात आलेल्या eEducation प्लॅटफॉर्मची मदत घेत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी व्हर्च्युअल क्लासरूमला क्रिएट केले जावू शकते. यात सेशनला रेकॉर्ड करण्यासोबतच विद्यार्थी नोट्स घेऊ शकतात. या अॅपवरून होमवर्क देवू शकतो. तसेच होमवर्क सबमिट करता येवू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here