Baban Bansidhar Lihinar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 23, 2022, 10:04 AM

Amazon Sale : सध्या फेस्टिव्ह सीजनला सुरुवात झाली आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेल सुरू झाले असून या सेलमध्ये खूपच स्वस्त किंमतीत इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळत आहे. आयफोन सुद्धा या सेलमध्ये स्वस्तात मिळत आहे. जाणून घ्या डिटेल्स.

 

iPhone SE

हायलाइट्स:

  • आयफोन १२ स्वस्तात खरेदीची संधी
  • आयफोन SE खूपच कमी किंमतीत
  • आजपासून अमेझॉन-फ्लिपकार्ट सेलला सुरुवात
नवी दिल्लीः iPhone 14 च्या लाँचिंग नंतर अन्य आयफोनच्या किंमतीवर खूप परिणाम झाला आहे. कारण, या फोनच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. आता Amazon ने आतापर्यंत सर्वात जबरदस्त iPhone 12 ऑफरची घोषणा केली आहे. या ठिकाणी २९ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत तुम्हाला फोन खरेदी करता येणार आहे. ई-कॉमर्स दिग्गज स्मार्टफोनवर केवळ सूट नव्हे तर एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जाते. Amazon Great Indian Sale वरून या ऑफरचा लाभ मिळवू शकता. दुसरीकडे Flipkart वर iPhone SE 2020 १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळत आहे. जाणून घ्या iPhone 12 आणि iPhone SE 2020 च्या डील संबंधी.

Amazon वर फक्त २८ हजार ३९९ रुपयात खरेदी करा iPhone 12
Amazon ने iPhone 12 च्या बेस 64GB व्हर्जनच्या किंमतीत कपात केली आहे. याची मूळ किंमत ६५ हजार ९०० रुपये आहे. अमेझॉनने स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करून या फोनची किंमत ४२ हजार ९९९ रुपये केली आहे. या स्मार्टफोनवर तुम्हाला कमीत कमी २२ हजार ९०१ रुपयाची बचत करता येवू शकते. ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत आहे. परंतु, आयफोन १२ च्या ट्रेड ऑफर्सच्या मदतीने तुम्हाला आणखी कमी किंमतीत या फोनला खरेदी करता येईल. अमेझॉन आयफोन १२ वर एक मोठा एक्सचेंज बोनस देत आहे. यावर तुम्ही १४ हजार ६०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. यामुळे आयफोन १२ ची किंमत कमी होवून फक्त २८ हजार ३९९ रुपये होईल. अमेझॉनने iPhone 12 सोबत कोणतीही बँकिंग ऑफर दिली नाही. ही ऑफर आयफोन १२ च्या खरेदीदारांसाठी फायदेशीर होईल. ही ऑफर आयफोन १२ च्या अन्य व्हेरियंटवर सुद्धा लागू आहे. सूट आणि एक्सचेंज नंतर आयफोन १२ च्या २५६ जीबी व्हेरियंटची किंमत फक्त ४३ हजार ३९९ रुपये होते.

Flipkart वर १३ हजार ५९९ रुपयात खरेदी करा iPhone SE 2020

Flipkart Sale मध्ये iPhone SE 2020 ला १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या डील सोबत काही अटी सुद्धा आहेत. iPhone SE 2020 ला १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येवू शकते. परंतु, एक्सचेंज ऑफर सोबत आणखी कमी किंमतीत मिळू शकतो. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार, Apple iPhone SE 2020 चे बेस 64GB व्हेरियंटची किंमत ३९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, हा फोन ३० हजार ४९९ रुपये किंमतीत मिळत आहे. म्हणजेच या फोनवर ९४०१ रुपयाची बचत करता येवू शकते. या फोनवर एक्सचेंज डील सुद्धा दिली जात आहे. या फोनवर १६ हजार ९०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. जर तुम्हाला एक्सचेंज बोनसचा लाभ मिळाल्यास iPhone SE 2020 ची किंमत कमी होवून फक्त १३ हजार ५९९ रुपये होते.

वाचाः ‘या’ ट्रिक्स फॉलो केल्यास ऑनलाइन सेलमध्ये मिळणार Best Deals, होणार बचत

वाचा: याहून चांगले काय ! Reliance Jio च्या प्लानमध्ये १०० रुपयांत ३ GB डेटासह OTT बेनेफिट्स, पाहा डिटेल्स

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here