वाचाः
तज्ज्ञ आणि इन्वेस्टर्सच्या म्हणण्यानुसार, अॅप बनवणे आणइ त्याला डिजिटल फुटप्रिंट बनवणे पुढचे पाऊल आहे. जे लोक याचा वापर करतात. ते वेगाने डिजिटल मार्केटमध्ये अॅप्सला यशस्वी करायचे असेल तर ते अॅप्स युजर्संना पसंत पडायला हवे. त्यानंतर अॅपवर युजर्संची संख्या वाढते. तसेच टिकून राहते. इंडस्ट्री डेटा च्या म्हणण्यानुसार १२ ते १५ टक्के रेट कोणत्याही शॉर्ट अॅप साठी चांगला मानला जातो.
वाचाः
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक
लाखो डाउनलोड्स असले तरी जोपर्यंत युजर्सं याचा वापर करीत नाही.तो पर्यंत या डाउनलोड्सला काही अर्थ उरत नाही. युजर्संना अॅपची सवय लागायला हवी. त्यानंतर त्या अॅपचे महत्त्व वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. टिकटॉक सारखे पॉवर फुल अॅप बनवण्यासाठी टॉप नॉच इंजिनियरिंग शिवाय एक पर्सनायलाजेशन आणि रेकमेंडेशन इंजिन हवे. जे युजर्संना पसंत पडतील असेच व्हिडिओ सजेस्ट करतील. यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक मार्केटमध्ये करावी लागते, युजर्संपासून क्रिएटर्स तयार करण्यासाठी पैसा लागतो.
इंडियन अॅप्समध्ये अनेक अडचणी
भारतात बनवलेल्या टिकटॉक सारख्या अॅप्समध्ये खूप बग्स पाहायला मिळत आहेत. तसेच सर्वर संबंधित अडचणी समोर आल्या आहेत. यासाठी युजर्संचा डेटा सिक्योरिटी वरूनही विश्वास केला जावू शकत नाही. एक्सपर्ट्सच्या माहितीनुसार, अनेक अॅप्स क्रॅश होत आहे. काही युजर्संना साईन-अप होताना अडचण येत आहे. केवळ एक अॅप बनवणे पुरेसे नाही. अॅप बनवणे आणि ब्रँड्स मध्ये खूप मोठा फरक आहे. टिकटॉकच्या मागे जगातील सर्वात पॉवरफुल स्टार्टअप ByteDance आहे. या अॅपला ६६ कोटी वेळा भारतात डाउनलोड करण्यात आले होते.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times