Amazon Great Indian Festival Sale 2022 : अॅमेझॉनचा सर्वात मोठा फेस्टिव्हल सेल आजपासून सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर आणि सूट देण्यात आली आहे. अनेक ग्राहकांनी तर शॉपिंगला सुरुवातही केली आहे. तुम्हाला सुद्धा या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये अलेक्सा डिव्हाईसवर 75% पर्यंत सूट देण्यात आली आहे. सेलमध्ये सर्वात मोठी सूट फायर स्टीक, इको स्पीकर, इको शो, किंडल आणि इतर अॅमेझॉनच्या प्रोडक्ट्सवर उपलब्ध आहे. तसेच तुम्ही SBI कार्डने पेमेंट केल्यास 1,750 रूपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. 

1-Echo Dot (3rd Gen, Black) + Wipro 9W LED Smart Color Bulb combo – Works with Alexa – Smart Home starter kit 

अलेक्सा स्पीकर हा सर्वाधिक  विकला जाणारा स्पीकर आहे. अलीकडच्या काळात तरूणाईत याची प्रचंड क्रेझ वाढली आहे. कारण यामधून हॅंड्स फ्री म्युझिकचा आनंद घेता येतो. या कॉम्बोमध्ये एक स्पीकर आणि विप्रोचा 9W चा स्मार्ट बल्ब उपलब्ध आहे. या कॉम्बोची किंमत 6,598 रुपये आहे. मात्र, डीलमध्ये 75% डिस्काउंट आहे त्यानंतर तुम्ही तो 1,599 रुपयांना खरेदी करू शकता.

2-Fire TV Stick with all-new Alexa Voice Remote (includes TV and app controls) | HD streaming device 

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये फायर स्टिकवरही मोठी विक्री सुरू आहे. या HD फायर स्टिकची किंमत 4,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 58% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही ही फायर स्टिक 1,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फायर स्टिकच्या मदतीने तुम्ही नॉर्मल टीव्हीला स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट करू शकता आणि त्यात YouTube किंवा इतर अॅप्सदेखील प्ले करू शकता. त्यामुळे ही फायर स्टीक तुम्ही विकत घेऊ शकता. 

3-All new Echo Show 5 (2nd Gen, Black) Combo with Mi LED smart color bulb 

हा इको शो (EchoShow) कॉम्बो अॅमेझॉन सेलमध्ये फक्त 4,049 रुपयांना उपलब्ध आहे. या इको शो ची खरी किंमत 9,998 रूपये आहे. जर तुम्ही अॅमेझॉन सेलवरून हा कॉम्बो विकत घेतल्यास तब्बल तुमची 5 हजारांची बचत होऊ शकते. कॉम्बोमध्ये Mi LED स्मार्ट बल्बसह Alexa वर आधारित व्हिडीओ स्पीकरचा समावेश आहे.   

4-All New Echo Show 5-2nd Gen (Black) combo with Fire TV Stick Lite 

या इको शोचा हा दुसरा कॉम्बो आहे जो 5,348 रुपयांना उपलब्ध आहे, ज्याची किंमत 12,998 रुपये आहे परंतु यावर 59% सूट देखील आहे. स्मार्ट व्हिडीओ स्पीकरसह या कॉम्बोमध्ये लाइट फायर स्टिक मिळत आहे. हा फायर स्टिक नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. 

Kindle Paperwhite (8 GB) – Now with a 6.8″ display and adjustable warm ligh

डिजीटल माध्यमांच्या आधारे वाचन करणाऱ्यांसाठी अॅमेझॉन सेलमध्ये उत्तम डील आहे. यामध्ये सर्वात मोठी सूट 11व्या सीरिजच्या 8 GB व्हेरियंटवर आहे. याची किंमत 13,999 रुपये आहे. परंतु ऑफरमध्ये तुम्ही 11,099 रुपयांना विकत घेऊ शकता. 

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाईटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या : 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here