Sale offers :आजकाल प्रत्येक युजरला शानदार फीचर्स असलेला ब्रँडेड स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. पण, अनेकदा बजेटची अडचण असते. पण, आता यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. Flipkart Big Billion Days आणि Amazon Great Indian Festival Sales दरम्यान लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म मोठ्या सवलती देत आहेत. स्मार्टफोनवर मोठ्या सवलतींनंतर, तुम्ही बँक कार्डच्या मदतीने १० टक्के अतिरिक्त सवलतीचा लाभ घेऊ शकता. Amazon SBI कार्ड ऑफर करत असताना, Flipkart ICICI आणि Axis Bank कार्डद्वारे पेमेंटवर सूट देत आहे. सेलमध्ये उपलब्ध असलेल्या सवलतींमुळे कमी किमतीत बरेच पर्याय उपलब्ध आहेत. सॅमसंग, Poco, डिव्हाइसेस खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. Amazon आणि Flipkart वरील बेस्ट डील्समधून तुम्ही तुमचा आवडता फोन निवडू शकता. आणि मजबूत बॅटरी- चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन्स स्वस्तात घरी आणू शकता.

.

Poco M4 5G

poco-m4-5g

Poco M4 5G: तुम्हाला १०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा 5G स्मार्टफोन हवा असेल तर ही सर्वोत्तम डील आहे. फोनचा 4GB + 128 GB व्हेरिएंट १५९९९ रुपयांऐवजी ९७४९ रुपयांना उपलब्ध आहे. POCO M4 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ६.५८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि पीक ब्राइटनेस ६०० निट्स आहे. यात वॉटरड्रॉप नॉच आहे. यामध्ये सेल्फी कॅमेरा मिळतो.

वाचा:Amazon Sale Live: १०८ MP कॅमेरासह पॅक्ड Xiaomi 11T Pro पहिल्यांदाच १० हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करण्याची संधी

​Infinix Note 12

infinix-note-12

Infinix Note 12: बिग बिलियन डेज सेलमध्ये १५,९९९ रुपयांच्या या फोनवर ७००० रुपयांची सूट मिळत आहे. ४४ टक्के सवलतीवर उपलब्ध, या फोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट व्यतिरिक्त ५००० mAh बॅटरी आणि ५० MP मुख्य कॅमेरा सेन्सर मिळतो. यामध्ये पॉवरसाठी ३३ वॉट टाइप सी फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची बॅटरी आहे. फोन अवघ्या दीड तासात फुल चार्ज होतो. फोन गोरिल्ला ग्लास ४ प्रोटेक्शन, १०८० x २४०० पिक्सल आणि DTS सराउंड सिस्टमसह ड्यूल स्पीकरसोबत येतो.

वाचा:Budget Smartwatches: फेस्टिव्ह सिझनमध्ये गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आहेत ‘या’ स्मार्टवॉचेस, किंमत २००० रुपयांपेक्षा कमी

​Tecno Spark 9T

tecno-spark-9t

Tecno Spark 9T: हे Tecno डिव्हाइस ९२९९ रुपयांना सूचीबद्ध आहे. परंतु , १० टक्के अतिरिक्त बँक सवलतीसह ८३६९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. फोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर उपलब्ध आहे आणि त्याची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये मायक्रो-यूएसबी चार्जिंग पोर्ट, मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट आणि फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 4G, Wi-Fi, ब्लूटूथ 5 आणि GPS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

वाचा : Flipkart Sale मध्ये ऑफर्सचा पाऊस ! ९०९९ रुपयांत मिळतोय ‘हा’ किलर स्मार्टफोन, फोनची किंमत ३४,९९९ रुपये

Redmi 10 A

redmi-10-a

Redmi 10A: ९४९९ रुपये किमतीचा हा फोन Amazon Great Indian Festival मध्ये २०३० च्या डिस्काउंटवर उपलब्ध आहे आणि ७४६९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि ५००० mAh बॅटरी असलेल्या या डिव्हाइसमध्ये १३ MP कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ वी५.०, GPS/ A-GPS, Micro-USB आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर बॅक कॅमेरा पॅनेलवर आहे.

वाचा:Online Shopping करताना राहा एक्स्ट्रा अलर्ट, अन्यथा पैसे पोहोचतील हॅकर्सकडे, पाहा सेफ्टी टिप्स

Samsung Galaxy M13

samsung-galaxy-m13

Samsung Galaxy M13: सॅमसंगच्या M-सिरीजचा हा दमदार फोन तुम्ही फक्त ८४९९ रुपयांना खरेदी करू शकता. मोठ्या ६००० mAh बॅटरी व्यतिरिक्त, Samsung Galaxy M13 फोनमध्ये ६.६ -इंचाचा फुल एचडी + इन्फिनिटी डिस्प्ले आणि मागील पॅनलवर ५० MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F13: फ्लिपकार्ट वर big billion days सेल दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी F13 १४९९९ रुपयांऐवजी ८४९९ रुपयांना मिळत आहे. Galaxy F13 मध्ये फोटोग्राफीसाठी ६.६-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आणि ५० MP मुख्य कॅमेरा आहे.

वाचा: सरकारने दिला इशारा, हॅकिंगपासून सुरक्षित राहायचे असेल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करुच नका

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here