Best Deals During Online Sale : देशात फेस्टिव सीजन सुरू झाला आहे. सध्या इंटरनेटवर ई-कॉमर्स साइट्स वर एका पेक्षा एक भारी डील मिळत आहे. ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart चा सेल (Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days sale) आजपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त किंमतीत व मोठ्या डिस्काउंट सोबत खरेदी करता येत आहेत. यात जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार डिस्काउंट सोबत प्रोडक्ट्सची विक्री केली जात आहे. जर तुम्हाला फेस्टिव्ह सीजन सेल दरम्यान बेस्ट डील मिळवायची असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही सोप्या ट्रिक्स सांगत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही बेस्ट डील मिळवू शकता तसेच हजारो रुपयाची बचत करू शकता. जाणून घ्या सोप्या टिप्स.

​कार्ड डिटेल आणि अॅड्रेस आधीच ठेवा सेव

ऑनलाइन सेल सुरू होण्याआधी पेमेंट करण्यासाठी ई-कॉमर्स साइटवर आपले अकाउंट जरूर बनवा. सोबत हे अकाउंट क्रिएट करण्यासोबत तुमचा अॅड्रेस, क्रेडिट कार्ड (Credit Card) /डेबिट कार्ड (Debit Card) ची डिटेल्स सेव करून ठेवा. यामुळे तुमचा वेळ वाचेल. तसेच सेल दरम्यान लवकरच कार्ट मध्ये टाकून प्रोडक्टला खरेदी करा.

वाचाः Apple कंपनीने चीनपेक्षा टाटावर दाखवला विश्वास, भारतात बनणार ‘मेड इन इंडिया आयफोन’

​रात्रीच लॉगइन करा

Amazon Great Indian Festival Sale 2022 आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2022 सेलला आजपासून म्हणजेच २३ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. या दोन्ही सेलमध्ये लाखो ग्राहकांना प्रोडक्ट्सवर सूट व डिस्काउंट दिला जाणार आहे. या सेलमध्ये स्वस्तात वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक जण वाट पाहत असतात. त्यासाठी तुम्ही रात्रीच लॉग इन करून ठेवा म्हणजे तुम्हाला लवकर प्रोडक्ट्सचे नाव टाकून ती खरेदी करण्यासाठी तुमचा लवकर नंबर लागेल. तुम्हाला तुमचे फेव्हरेट प्रोडक्ट्स बेस्ट डील मध्ये खरेदी करता येईल.

वाचाः याहून चांगले काय ! Reliance Jio च्या प्लानमध्ये १०० रुपयांत ३ GB डेटासह OTT बेनेफिट्स, पाहा डिटेल्स

​मेंबरशीपचा फायदा होईल

अमेझॉन प्राइम सदस्यासाठी एक दिवस आधीच सेल सुरू केला जातो. तर दुसरीकडे फ्लिपकार्ट प्लस मेंबर्सला वेगळा फायदा मिळू शकतो. यासाठी फ्री शिपिंग, एक्स्ट्रा डिस्काउंट आणि अनेक लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ई-कॉमर्स साइटची मेंबरशीप आधीच घेणे फायदेशीर होईल. १२ महिन्याच्या फ्लिकार्ट प्लस मेंबरशीपसाठी यूजर्सला २०० सुपर कॉइन जमा करावे लागतात. तर अमेझॉन प्राइम मेंबरशीपचे ३० दिवसाच्या प्लानची किंमत १७९ रुपये आहे.

वाचाः Airtel चा पैसा वसूल प्लान ! एका महिन्याच्या रिचार्जमध्ये ९० दिवस Free OTT सब्सक्रिप्शन, पाहा किंमत

​कार्टमध्ये ठेवा प्रोडक्ट

ऑनलाइन खरेदी करताना डिस्काउंट मिळवण्याचा बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही शॉपिंग कार्ट मध्ये त्या प्रोडक्ट्ला आधीच ठेवा. यानंतर पेमेंट न करता त्याला साइडला ठेवू शकता. याला ‘शॉपिंग कार्ट अबँडनमेंट’ म्हटले जाते. जास्तीत जास्त वेबसाइट मध्ये हेच होते. यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल की, तुम्ही जो प्रोडक्ट कार्टमध्ये ठेवले आहे त्यावर आकर्षक सूट दिली जात आहे.

वाचाः Weather Apps for Android: पावसाचा अलर्ट!, एका क्लिकवर कळणार पाऊस कधी पडणार

​कॅशबॅक अॅप आणि साइटचा वापर करा

ऑनलाइन ई-कॉमर्स साइटवरून कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना जास्तीत जास्त बचत करण्यासाठी गोपैसा, क्राउनिट, नियरबाय, टॅपजो आणि मॅजिकपिन सारख्या कॅशबॅक अॅप्सला डाउनलोड करू शकता. या ठिकाणी तुम्हाला कूपन सोबत कॅशबॅक कूपन मिळते. याचा वापर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या साइट्स वर खरेदी करून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकतात.

वाचाः Amazon Sale चा धुमाकूळ ! १४९ रुपयांच्या किमतीत मिळताहेत जबरदस्त साउंड क्वालिटीचे Earphones

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here