वाचाः
इंडस्ट्री रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, चीनच्या बाहेर भारतात टिकटॉकला सर्वात जास्त मार्केट होते. भारत सरकारकडून या आठवड्यात सुरुवातीला ५९ चायनीज अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला. ज्यात टिकटॉकचा सुद्धा समावेश होता. पब्लिकेशन्सच्या माहितीनुसार, याचा थेट परिणाम चायनीज ट्रेडर्स आणि गुंतवणूकादारांवर पडला आहे. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चीनच्या गुंतवणूकदार आणि बिझनेसमॅनला जोरदार झटका बसला आहे.
वाचाः
भारतात हिट होते
बाईटडान्सला अॅपवर जाहिरात दाखवण्यासाठी जो पैसा मिळत होता. तो आता या बंदीनंतर मिळणे बंद झाला आहे. कंपनीचे हे अॅप्स खास करून भारतात खूप प्रसिद्ध झाले होते. भारताचा थेड ग्रामीण भागापर्यंत हे अॅप पोहोचले होते. टिकटॉ भारतात ६६ कोटी वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. परंतु, सध्या टिकटॉकला प्ले स्टोर आणि अॅप स्टोरवरून हटवण्यात आले आहे.
डेटा सिक्योरिटी हे बनले कारण
भारत सरकारकडून चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. देशातील नागरिकांची डेटा सिक्योरिटी धोका निर्माण झाल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. भारत चीन सीमेवर तणाव वाढल्याने चायनीज उत्पादनावर बंदी घालण्याची मोहीम सोशल मीडियावर जोरात सुरू झाली होती. देशभरात चीन विरोधी वातावरण सुरू असताना केंद्र सरकारने हा निर्णय घेतला.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times