नवी दिल्लीः गेमची क्रेझ आताही तितकीच आहे. गेम संबंधी एक चक्रावून टाकणारी बातमी समोर आली आहे. पंजाब मध्ये एका अल्पवयीन मुलाने गेम खेळताना या अॅपला खरेदी करण्यासाठी आणि अपग्रेडिंग करण्यासाठी तब्बल १६ लाख रुपये खर्च करून टाकले. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, १७ वर्षाच्या एका मुलाकडे तीन बँकाच्या अकाउंट्सची माहिती होती. पबजी गेमच्या आहारी गेलेल्या या मुलाने अॅपमध्ये खर्च करण्यासाठी या बँक अकाउंट्सचा वापर केला.

वाचाः

अल्पवयीन मुलाने आपल्या आई-वडिलांना सांगितले होते की, अभ्यासासाठी मोबाइलचा वापर करीत आहे. परंतु, अभ्यासाच्या नावाखाली तो दिवस रात्र पबजी गेम खेळत बसायचा. गेम खेळताना तो आपल्या टीममेट्ससाठी सुद्धा अपग्रेड खरेदी करत होता. द ट्रिब्यूनच्या एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. आई-वडिलांना आपले बँक अकाउंट चेक केल्यानंतर ही माहिती समोर आली. बँक खात्यातून तब्बल १६ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. बँक ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर आई-वडिलांना याची माहिती होऊ नये यासाठी हा मुलगा सर्व मेसेज डिलीट करत असायचा. आई वडिलांनी हा पैसा मुलाच्या भविष्यासाठी आणि आवश्यक वस्तूंच्या खऱेदीसाठी बँकेत ठेवला होता.

वाचाः

अल्पवयीन मुलाचे वडील एक सरकारी कर्मचारी आहेत. मुलाने एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले. कुणाला संशय येऊ नये. पबजीवर तब्बल १६ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समजताच आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून सर्व माहिती सांगितली. परंतु, पोलिसांनी कोणतीही मदत करण्यास नकार दिला. मुलाने स्वतःहून हे पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे पबजी विरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल करता येत नाही, असे पोलिसांना सांगितले.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here