नवी दिल्लीः स्मार्टफोनचा 4GB रॅम फोनची किंमत पुन्हा एकदा वाढवली आहे. रेडमीच्या या फोनच्या किंमतीत ३०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रेडमी ८ चा ४ जीबी रॅमचा फोनची किंमत आधी ९ हजार ४९९ रुपये होती. गेल्या काही महिन्यांपासून या फोनच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यात या फोनची किंमत २०० रुपये वाढवण्यात आली होती. ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्टनुसार, ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या Redmi 8 स्मार्टफोन ९ हजार ४९९ रुपयांत विकला जात होता. परंतु, आता या फोनची देशभरात ऑफलाइन आणि ऑनलाइन स्टोर्सवर ९ हजार ७९९ रुपये किंमत झाली आहे.

वाचाः

८ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच झाला होता फोन
रेडमी ८ चा ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत वाढली आहे. वाढलेली किंमत mi.com आणि फ्लिपकार्टवर दिसत आहे. या फोनचा ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजचा फोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ७ हजार ९९९ रुपयांत लाँच झाला होता. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि वॉटरड्रॉप स्टाईल डिस्प्ले नॉच दिला आहे. शाओमीने काही आठवड्याआधी रेडमी नोट ९ प्रो मॅक्स आणि रेडमी ८ए ड्युअल च्या किंमतीत वाढ केली आहे.

वाचाः

रेडमी ८ ची खास वैशिष्ट्ये
Redmi 8 स्मार्टफोन MIUI 10 सोबत अँड्रॉयड १० वर चालतो. या फोनमध्ये MIUI 11 सोबत १० अपडेट मिळणे सुरू झाले आहे. फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४३९ प्रोसेसर दिला आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,000 mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here