नवी दिल्लीः चायनीज शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप ला भारतात बंदी घातली आहे. या अॅपला आता गुगल प्ले स्टोर आणि अॅपल अॅप स्टोरवरून हटवले आहे. भारतात या अॅपचे आता अॅक्सेस मिळत नाही. तरीही युजर्सला अॅक्सेस देण्याचे अमीष दाखवून मोबाइलमध्ये मॅलिशस अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले जात आहे. अनेक युजर्संना मेसेज पाठवले आहेत. टिकटॉकचे अॅक्सेससाठी एक लिंक देण्यात आली आहे.

वाचाः

भारतात कोट्यवधी युजर्स टिकटॉकचा रोज वापर करीत होते. अॅपवर बंदी घातल्यानंतर दुसरे अॅप्स डाऊनलोड करीत आहेत. अनेक युजर्स अज्ञात नंबरवरून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज पाठवत आहेत. ज्यात दावा करण्यात आला आहे की, आता केवळ च्या मदतीने भारतात टिकटॉक व्हिडिओ पाहू शकता किंवा अपलोड केले जाऊ शकते. हा सर्व प्रकार म्हणजे युजर्संना फसवण्याचा एक कट आहे.

वाचाः

टिकटॉक प्रो ची लिंक
पाठवण्यात येत असलेल्या मेसेजमध्ये लिहिले, टिकटॉक व्हिडिओ एन्जॉय करा आणि पुन्हा एकदा क्रिएटिव्ह व्हिडिओज बनवा. आता टिकटॉक केवळ (TikTok Pro) मध्ये उबलब्ध आहे. खाली दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा. या मेसेजच्या खाली एक लिंक दिली आहे. http://tiny.cc/TikTokPro लिंकवर टॅप केल्यानंतर एक apk फाइल डाउनलोड होते. परंतु, इन्स्टॉल केल्यानंतर टिकटॉक आयकॉनचा अॅप दिसतो. परंतु, तो एक मेलवेयर आहे.

वाचाः

धोकादायक आहे मेलवेयर
जर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर खाली दिलेल्या लिंकवर टॅप करू नका. हे एक मेलवेयर आहे. जे तुमच्या फोनला आणि तुमच्या डेटासाठी धोकादायक आहे. लोकांना फसवण्यासाठी टिकटॉकच्या आयकॉनचा वापर करण्यात आला आहे. इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सच्या स्टोरेज आणि कॅमेरा मायक्रोआयफोनचा अॅक्सेस करण्यासाठी परमिशन मागितले जाते. त्यानंतर याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे अशा धोकायदाक लिंकपासून सावध राहायला हवे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here