नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी अर्थात बीएसएनएलने आपल्या युजर्ससाठी नवीन वर्क फ्रॉम होम प्लान आणला आहे. कंपनी नवीन ५९९ रुपयांचा प्रीपेड STV घेऊन आली आहे. या प्लानवरून रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना दररोज ५ जीबी डेटा मिळणार आहे.

वाचाः

कंपनीचा ५९९ रुपयांचा वर्क फ्रॉम होम एसटीव्ही प्लानच्या मदतीने देशभरातील युजर्संना रिचार्ज करता येणार आहे. यात आधीही बीएसएनएलकडून ५५१ रुपयांचा डेटा बेनिफिट्स देण्यात येत होता. परंतु, त्यावेळी याचा फायदा केवळ आंध्र प्रदेश, तेलंगाना सर्कलमधील युजर्संना मिळत होता. ५९९ रुपयांच्या नवीन प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. तसेच यात फ्री व्हाईस कॉलिंग आणि एसएमएसचे बेनिफिट्स सुद्धा दिले जाते.

वाचाः

अनलिमिटेड कॉलिंग फ्री
गेल्या ५५१ रुपयांचा प्लान डेटा ओन्ली प्लान होता. परंतु, नवीन ५९९ रुपयांचा एसटीव्हीला अनलिमिटेड कॉम्बो प्लान म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या प्लानच्या बेनिफिट्समध्ये देशभरात सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंगचा ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच या प्लानमध्ये रोज २५० मिनिट युजर्संना मिळणार आहेत. या शिवाय, रोज ५ जीबी हाय स्पीड डेटा आणि १०० एसएमएस सुद्धा या प्लानमध्ये ऑफर केले जात आहे.

वाचाः

एकूण ४५० जीबी हाय स्पीड डेटा
बीएसएनएलच्या या नवीन प्लानच्या मदतीने देशभरातील सर्व सर्कल (मुंबई आणि दिल्ली सोडून) मध्ये रिचार्ज करता येवू शकते. कंपनीने सांगितले की, ५ जीबी डेली डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80 Kbps होते. या प्लानला वर्क फ्रॉम होम म्हटले जाते. कारण, यात खूप सारा डेटा मिळतो. ९० दिवसांच्या वैधतेनुसार यात ४५० जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here