Samsung ने नुकतेच आपले नवीन स्मार्टफोन स्मार्टफोन्स देशात लाँच केले आहेत. या सोबतच दक्षिण कोरियाची कंपनीने जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या अनेक हँडसेट्सवर ऑफर करीत असल्याची घोषणा केली आहे. सध्या भारतात चीनी कंपन्याविरोधात वातावरण आहे. भारत सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. या अॅप्समध्ये प्रसिद्ध टिकटॉकचा समावेश आहे. टिकटॉक सारख्या देसी अॅप्सला या बंदीचा प्रचंड फायदा होताना दिसत आहे. चायनीज अॅप्सनंतर आता देशात चायनीज फोन्सवर सुद्धा बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सॅमसंगने ज्या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यात उनमें गॅलेक्सी ए50एस, गॅलेक्सी ए21, गॅलेक्सी ए31 आणि गॅलेक्सी नोट 10 लाइट या स्मार्टफोनचा समावेश आहे. जाणून घ्या कोणत्या स्मार्टफोनची किंमत किती कमी करण्यात आली आहे…

गॅलेक्सी ए ३१ स्मार्टफोन प्रिझ्म क्रश ब्लॅक, प्रिझ्म क्रश ब्लू आणि प्रिज्म क्रश व्हाईट कलर मध्ये मिळतो. फोनला ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजसोबत २१ हजार ९९९ रुपयात लाँच करण्यात आला होता. आता कंपनीने हँडसेटच्या किंमतीत १ हजार रुपयांची कपात केली आहे. म्हणजेच हा फोन आता २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या वेबसाइट शिवाय ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.

सॅमसंगचा हा फ्लॅगशीप फोन नुकताच स्वस्त करण्यात आला आहे. कंपनीने गॅलेक्सी नोट १० लाइटच्या किंमतीत कपात करण्यासोबतच कॅशबॅक ऑफर्सचीही घोषणा केली आहे. फोनच्या किंमतीत ४ हजार रुयपांची कपात करण्यात आली आहे. गॅलेक्सी नोट १० लाइट च्या ६ जीबी रॅम व्हेरियंटला आता ३७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येतो. ८ जीबी रॅम व्हेरियंटला ३९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करु शकतो. तसेच सिटीबँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरून फोन खरेदी केल्यास ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळतो. कॅशबॅक नंतर नोट १० लाइट्या ६ जीबी व्हेरियंटची किंमत ३२ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे.

सॅमसंगने काही दिवसापूर्वी गॅलेक्सी ए ५० हँडसेटची किंमतीत कपात करण्यात आली होती. फोनचे ४ जीबी रॅम व्हेरियंट २६ हजार ९०० रुपयांच्या जागी २० हजार ५६१ रुपयात खरेदी करता येवू शकतो. हँडसेटमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सोबत ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप मिळतो. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सॅमसंगचा फोन जबरदस्त आहे. तुमचे मिड बजेट असेल तर सॅमसंग गॅलेक्सी ए५०एस स्मार्टफोन खरेदी करता येवू शकतो.

सॅमसंग गॅलेक्सी ए २१ च्या किंमतीत २३०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. फोनचा ४ जीबी रॅम व्हेरिंयटची किंमत १४ हजार ९९९ रुपये होती. आता हा फोन १२ हजार ६९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. तर ६ जीबी रॅमचा व्हेरियंट आता १६ हजार ४९९ रुपयांच्या जागी १४ हजार २२२ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. गॅलेक्सी ए २१ मध्ये 6000mAhबॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here