नवी दिल्लीः सॅमसंगने आपली सीरिजला लाँच करण्याची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांत आलेल्या या रिपोर्टमध्ये म्हटले की, या सीरिजच्या स्मार्टफोन्सला गॅलेक्सी झेड फ्लिप आणि गॅलेक्सी फोल्ड २ सोबत ५ ऑगस्टला लाँच करणार आहे. नवीन स्मार्टफोन हे महाग असतील गॅलेक्सी नोट २० सीरिजच्या फोनची किंमत १२४९ डॉलर (जवळपास ९३ हजार रुपये) पासून १४९९ डॉलर (१.११ लाख रुपये) या दरम्यान असू शकते.

वाचाः

७४ हजार रुपयांचा असू शकतो बेस व्हेरियंट
आइस युनिव्हर्सच्या माहितीनुसार, गॅलेक्सी नोट २० सीरिजची बेस व्हेरियंट ९९९ डॉलर (जवळपास ७४ हजार,३०० रुपये) असू शकते. तसेच याच्या टॉप अँड व्हेरियंटची म्हणजे गॅलेक्सी नोट २० अल्ट्राची किंमत १२९९ डॉलर पर्यंत असू शकते. गॅलेक्सी नोट ९४६ डॉलर आणि नोट १० प्लस १०९९ डॉलर सोबत येवू शकतो. दोन्ही व्हेरियंट २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत येईल.

मिळू शकतात हे फीचर
गॅलेक्सी नोट २० सीरिजच्या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस प्रोसेसर किंवा Exynos 992 प्रोसेसर येईल. या सीरिजमध्ये १६ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळू शकतात. लीक्स झालेल्या माहितीनुसार, सर्व डिव्हाईसमध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले आणि 120Hz चे रिफ्रेश रेट सोबत येईल. नोट २० सीरिजचे स्मार्टफोन अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येईल. फोनमध्ये किती रियर कॅमेरा असतील याची माहिती अद्याप समोर आली नाही.

वाचाः

फोटोत दिसला गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा
गेल्या काही दिवसांपासून लिक्स आणि रेंडर येत आहेत. यात दरम्यान इंटरनेटवर सॅमसंगने गॅलेक्सी नोट २० अल्ट्राचा खरा फोटो शेयर केला आहे. कंपनीने चुकून हा फोटो आपल्या युक्रेनच्या वेबसाईटवर पोस्ट केला होता.

शेअर करण्यात आलेल्या फोटोत फोनचा मिस्टिक कलर पाहिला जावू शकतो. फोनच्या बॅक पॅनेलवर तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिसेल. हा गॅलेक्सी एस २० लाइनअपसारखा एक रेक्टँग्युलर मध्ये फीट आहे. कॅमेरा सेटअपसोबत एलईडी फ्लॅश सुद्धा दिला आहे. सॅमसंगने या फोनचे फिजिकल बटन्स राईट साईडमध्ये प्लेस केले आहेत. फोनसोबत देण्यात आलेला एस पेन सुद्धा ब्राँझ कलरचा आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here