नवी दिल्लीः भारत संचार निगम लिमिटेड अर्थात आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवीन-नवीन ऑफर्स घेवून येतेय. एका नवीन ऑफर अंतर्गत कंपनी आपल्या युजर्संना ५ जीबी हायस्पीड डेटा एकदम फ्रीमध्ये देत आहे. ग्राहकांना हा फ्री डेटा कंपनीच्या वायफाय हॉटस्पॉटवरून मिळणार आहे. बीएसएनएलने ५ जीबी डेटा कसा मिळवायचा यासंबंधीची पद्धत आपल्या ट्विटर अकाउंटवर युजर्संना सांगितली आहे. या सुविधेसाठी कंपनीने एक यूट्यूब व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात सर्व स्टेप्स सांगितल्या आहेत. या ऑफरचा लाभ कंपनीच्या लँडलाईन युजर्संना मिळू शकणार आहे. जाणून घ्या ही पद्धत.

वाचाः

फ्रीमध्ये ५ जीबी डेटा मिळवण्याची पद्धत

>> आपल्या स्मार्टफोनमध्ये वायफाय ओपन करा. आणि BSNL Wi-Fi SSID सिलेक्ट करा

>> एक पेज ओपन होईल. या ठिकाणी तीन पर्याय Public Wifi, BSNL users आणि Landline मिळतील.

>> Landline च्या ऑप्शनवर क्लिक करा.

>> आपला बीएसएनएल लँडलाईन नंबर STD कोडसोबत नोंदवा. त्यानंतर Get PIN वर टॅप करा.

>> आता तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक पिन येईल.

>> तो टाकून Login करा. आता तुम्हाला फ्रीमध्ये ५ जीबी डेटा मिळू शकतो.

वाचाः

ही ऑफर केवळ लँडलाईन युजर्ससाठी आहे. ज्यांच्याकडे बीएसएनएलची हॉटस्पॉटची सुविधा उपलब्ध असेल. ५ जीबी फ्री डेटा संपल्यानंतर युजर्संना एक मेसेज येईल. ज्यात सांगितले जाईल की, तुमचा फ्री डेटा संपला आहे. जर तुम्हाला आणखी डेटा हवा असल्यास तुम्ही डेटा प्लान खरेदी करू शकता.

वाचाः

५९९ रुपयांत ५ जीबी डेटा
कंपनीने ५९९ रुपयांचा नवीन प्रीपेड व्हाउचर आणला आहे. नवीन प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. तसेच सर्व नेटवर्क्सवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग, रोज ५ जीबी स्पीड डेटा आणि १०० फ्री एसएमएस ऑफर केले जात आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here