Amazon Great Indian Festival Sale Offers : Amazon India च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत. या सेलमध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट ऑफर्ससह प्रत्येक विभागातील स्मार्टफोन खरेदी करू शकता. त्याच वेळी, जर तुम्ही बजेट सेगमेंटमध्ये स्वत:साठी एक मजबूत स्मार्टफोन मिळवण्याचा विचार करत असाल, तर या सेलमध्ये पर्यायांची कमतरता नाही. काही जबरदस्त स्मार्टफोन्स Amazon Great Indian Festival Sale मध्ये खूपच कमी किमतीत खरेदी करण्याची संधी तुमच्यकडे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत, जे तुम्ही Amazon च्या या सेलमध्ये डिस्काउंटनंतर केवळ १२ हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. लिस्टमध्ये Realme Narzo 50 5G, Samsung Galaxy M32 Prime, iQOO Z6 44 W, Oppo A54, redmi 11 prime 5g सारख्या काही शानदार स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Redmi 11 Prime 5G

redmi-11-prime-5g

Redmi 11 Prime 5G: या Redmi फोनची सुरुवातीची किंमत १२,९९९ रुपये आहे. विक्रीमध्ये, त्याची किंमत ११,७४९ रुपये झाली आहे. फोनसोबतच कंपनी Amazon Pay वर २००० रुपयांचे रिवॉर्ड देखील देत आहे. फोन १ अब्ज रंगांसह AMOLED डिस्प्लेसह येतो. redmi 11 prime 5g फोनच्या मागील बाजूस ५० -मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन MediaTek Dimensitu 700 चिपसेट वर काम करतो. युजर्सना आवफत्तील असे शानदार फीचर्स Redmi 11 Prime 5G मध्ये पाहायला मिळतील.

वाचा: One Plus चे 5G स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळतोय भन्नाट ऑफ

​iQOO Smartphone

iqoo-smartphone

iQOO Z6 44 W: iQOO Z6 44W फोनची सुरुवातीची किंमत १३,९९९ रुपये आहे.पण, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही iQOO Z6 44W केवळ ११,४९९ रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकता. कंपनीचा हा फोन फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सेल एआय रियर कॅमेरा सह येतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. तुमचे बजेट जर १२ हजारांपर्यंत असेल तर iQOO Z6 44W नक्कीच तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा: असा करा WhatsApp चा अधिक सेफ वापर, नुकसान टाळण्यासाठी या गोष्टींकडे द्या लक्ष

Realme Narzo 50 5G

realme-narzo-50-5g

Realme Narzo 50 5G: Amazon India च्या सर्वात मोठ्या सेलमध्ये Realme Narzo 50 5G हा फोन सर्वोत्तम डीलमध्ये तुमचा असू शकतो. फोनची सुरुवातीची किंमत १४,३३९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये तुम्ही १०,९९९ रुपयांच्या प्रभावी किंमतीसह हा जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनी फोनसोबत मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देखील देत आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Realme Narzo 50 5G फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimension 810 5G प्रोसेसरसह ४८ – मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

वाचा: Battery Tips : स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर नोट करा ‘या’ टिप्स, फोन चालेल नव्यासारखा

oppo A54

oppo-a54

Oppo A54: ११,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येणारा हा फोन Amazon इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये १०,२२१ रुपयांच्या प्रभावी किंमतीसह खरेदी केला जाऊ शकतो. Oppo चा हा बजेट स्मार्टफोन अनेक उत्तम फीचर्सनी सुसज्ज आहे. यामध्ये तुम्हाला ५००० mAh बॅटरी आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल.OPPO A54 मध्ये ६.५१ इंच एचडी+ आयपीएस एलसीडी पॅनेल दिला असून, याचा आस्पेक्ट रेशियो १९:९ आहे. डिव्हाइसमध्ये मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसरसह ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते.

Samsung Galaxy M32 Prime

samsung-galaxy-m32-prime

Samsung Galaxy M32 Prime: सॅमसंगचे स्मार्टफोन्स तुम्हाला आवडत असतील तर, Samsung Galaxy M32 Prime खरेदी करून मोठी बचत करू शकता. तुम्ही सेलमध्ये Samsung Galaxy M32 Prime ११ ,४९९ रुपयांऐवजी १०,३४९ रुपयांना खरेदी करू शकता. हा फोन ६.४ -इंचाच्या फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. ६००० m Ah बॅटरीने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ६४ – मेगापिक्सेल क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. प्रोसेसर म्हणून, तुम्हाला त्यात MediaTek Helio G 80 चिपसेट दिसेल.

वाचा: Reliance Jio चे प्लान्स, एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेन्शन फ्री राहा, सोबत १०९५ GB डेटा आणि फ्री डिस्ने + हॉटस्टार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here