नवी दिल्लीः जगभरात प्रसिद्ध मेसेजिंग अॅप ने गेल्या काही आठवड्यापासून नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. अॅनिमेटेड स्टिकर्स, वेबसाठी आता डार्क मोड कंपनीने आणले आहे. तसेच KaiOS सारख्या ऑपरेटिंग सिस्टमच्या फोन्ससाठी स्टेट्स फीचर्स आणले आहे. आता कंपनी लवकरच सर्वसामान्य युजर्ससाठी सपोर्ट आणणार आहे. या फीचरचा फायदा म्हणजे व्हॉट्सअॅपवर नंबर सेव्ह करण्याची पूर्ण पद्धत बदलणार आहे.

वाचाः

कंपनी या फीचरला अनेक महिन्यांपासून चाचणी करीत आहे. काही व्हॉट्सअॅप बीटा युजर्सला हे फीचर्स गेल्या वर्षी मिळाले होते. आता हे फीचर लवकरच सर्व युजर्संसाठी जारी करण्यात येईल. त्यानंतर सर्व युजर्संला आपला युनिक क्यूआर कोड असणार आहे. दुसऱ्या युजर्संना स्कॅन करुन आपल्या फोनवर नंबर सेव्ह करता येणार आहे.

वाचाः

याप्रमाणे काम करेल क्यूआर कोड
व्हॉट्सअॅप युजर्सची प्रोफाईलच्या बाजुला एक क्यूआर कोड येईल. या कोडला पाहण्यासाठी युजर्सला अॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. ज्या ठिकाणी नाव आणि पिक्चर सोबत हा कोड सुद्धा मिळेल. जर तुम्ही सुद्धा क्यूआर कोडच्या आयकॉनवर टॅप कराल तर हे माय कोडच्या नावाने एका टॅबमध्ये ओपन होईल. हे कोड तुम्हाला दुसऱ्या नंबरवर शेअर करता येईल.

वाचाः

My code च्या बाजुला युजर्सला Scan Code चा पर्याय मिळेल. यासाठी तुमच्या फोनचा कॅमेरा ओपन होईल. ज्यात तुम्ही कोणत्याही युजरला कोड स्कॅन करून नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करु शकाल. म्हणजेच तुम्हाला नंबर टाईप करावे लागणार नाही. गेल्या आठवड्यात या फीचरची घोषणा करण्यात आली होती. परंतु, आता सर्व युजर्संना ही सुविधा मिळणे बाकी आहे. हे फीचर्स काही आठवड्यात सर्व युजर्संना मिळेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here