वाचाः
फोनची किंमत
पोको एम२ प्रो स्मार्टफोन तीन व्हेरियंटमध्ये येतो. 4GB + 64GB मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये, 6GB + 64GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये, आणि 6GB + 128GB मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन तीन रंगात म्हणजेच ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे.
वाचाः
४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर, ५ मेगापिक्सलचा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. कॅमेरा अॅप मध्ये प्रो कलर मोड, प्रो व्हिडिओ मोड आणि रॉ मोड मिळतो. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा इन स्क्रीन फ्रंट कॅमेरा दिला आहे. फ्रंट कॅमेऱ्यात नाईड मोड देण्यात आला आहे.
वाचाः
फोनचे अन्य खास वैशिष्ट्ये
पोको एम२ प्रो मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. जो फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन (1080×2400 पिक्सल) सोबत येतो. फोनला प्रोटेक्शनसाठी यात फ्रंट, रियर आणि कॅमेऱ्यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ मिळतो. अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. फोन अनलॉक करण्यासाठी साईड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉक फीचर दिले आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times