नवी दिल्लीः जर तुम्हाला रेडमी स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही खास संधी आहे. चा आज सेल आहे. या स्मार्टफोनचा सेल आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन आणि mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. Redmi Note 9 Pro Max च्या रियरमध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहे. तर फोनच्या फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२०जी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

फोनची किंमत आणि मिळणारी ऑफर
Redmi Note 9 Pro Max ची भारतात सुरुवातीची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. ही किंमत ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ४९९ रुपये आहे. रेडमीच्या या दोन्ही व्हेरियंट्स अॅमेझॉन आणि mi.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच ग्राहकांना या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचा फोन mi.com वर १९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. हा फोन अरॉरा ब्लू, ग्लेशियर व्हाईट आणि इंटरस्टेलर ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध आहे.

वाचाः

ग्राहकांना २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या अनलिमिटेड पॅक्ससोबत एअरटेल डबल डेटा बेनेफिट्सचा फायदा घेता येवू शकतो. तसेच अॅमेझॉन प्राईम सदस्यांने जर हा फोन खरेदी केला तर अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडीट कार्डचा वापर करीत असल्यास त्यांना ५ टक्के डिस्काउंट मिळेल. Redmi Note 9 Pro Max आणि Redmi Note 9 Pro स्मार्टफोन या वर्षीच्या मार्चमध्ये लाँच करण्यात आले होते.

वाचाः

स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये
Redmi Note 9 Pro Max स्मार्टफोन MIUI 11 वर आधारीत आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. तसेच ८ जीबी रॅम पर्यंत स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. या स्मार्टफोनमध्ये रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. तसेच ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.

वाचाः

सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा
फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,020 mAh ची बॅटरी दिली आहे. जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये 4G VoLTE, वायफाय 802.11ac, ब्लूटूथ v5.0, इंफ्रारेड, यूएसबी Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक कनेक्टिविटी फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here