नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने आपला स्मार्टफोन अखेर लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ३४९ यूरो (२९ हजार ५०० रुपये) ठेवण्यात आली आहे. हा कंपनीचा स्रवात स्वस्त ५ जी स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनचा थेट सामना वनप्लसच्या स्मार्टफोनसोबत होईल. या स्मार्टफोनमध्ये ड्यूल पंचहोल डिझाईनचा ६.७ इंचाचा मोठा डिस्प्ले मिळणार आहे.

वाचाः

मोटोरोला Moto G Plus ची किंमत
या फोनला सध्या युरोपियन मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे. या फोनचा 4GB रॅम+ 64GB स्टोरेजच्या मॉडलची किंमत ३४९ युरो (२९ हजार ५०० रुपये) आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेजच्या फोनची किंमत ३९९ यूरो (जवळपास ३३ हजार ७०० रुपये) मोटोरोलाच्या या स्मार्टफोनला लवकरच यूएसमध्ये लाँच करण्यात येणार आहे. याची किंमत ५०० डॉलर (जवळपास ३७ हजार ४०० रुपये) असणार आहे.

वाचाः

फोनचे खास वैशिष्ट्ये कोणती ?
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या मागे चार कॅमेरे दिले आहेत. फोनच्या मागे ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. फोनला ५ जी कनेक्टिविटी सपोर्ट करते.

वाचाः

सेल्फीसाठी फोनमध्ये २ जबरदस्त कॅमेरे
सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचे दोन लेन्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 20W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट आणि एनएफसी सपोर्ट मिळते. फोन Android 10 वर काम करणाऱ्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५ प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here