नवी दिल्लीः वनप्लसने गेल्या काही दिवसात आपली यू आणि वाय सीरीज अंतर्गत नवीन अँड्रॉयड टीव्ही भारतात लाँच केले आहे. या स्मार्ट टिव्हीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. वनप्लस इंडियाने ट्विट करून याची माहिती दिली आहे. या टीव्हीचा पहिल्या फ्लॅश सेलमध्ये वनप्लस टीव्ही अवघ्या एका मिनिटात विकले गेले आहेत. तसेच कंपनी लवकरच पुढचा सेल आयोजित करणार आहे. वनप्लसने ५५ इंचाचा ४के मॉडल, ४३ इंचाचा फुल एचडी मॉडल आणि ३२ इंचाचा एचडी मॉडल लाँच केले आहेत. वनप्लसच्या या टीव्ही अँड्रॉयड टीव्ही पाय सिस्टमवर चालतात.

वाचाः

वनप्लस TV प्रोडक्टला युजर्संचा जबरदस्त प्रतिसाद
वनप्लस इंडियाच्या माहितीनुसार, नवीन वनप्लस टीव्ही प्रोडक्टला युजर्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या टीव्हीला फर्स्ट बॅच भारतात केवळ एका मिनिटात विकली गेली आहे. वनप्लसची यू सीरीज मध्ये आलेल्या ५५ इंचाच्या फ्लॅगशीप मॉडलमध्ये सुपर स्ट्रीमलाइन्ड मेटल चेसिस आणि अॅल्यूमिनिअम एलॉय फ्रेमचा वापर केला आहे. टीव्हीत मागच्या बाजुला एक मोठे मॉड्यूलमध्ये मदरबोर्ड, स्पीकर कंपोनेंट्स आणि पोर्ट्स देण्यात आले आहेत. हा टीव्ही फायबर टेक्स्चर्ड मटेरियलच्या लेयरने कवर्ड केला आहे. त्यामुले याचा लूक आणखी अडवॉन्स बनतो. तसेच पोर्ट्सचे प्रोटेक्ट आणि हाईड करण्यासाठी रिमूव्हेबल कव्हर दिला आहे.

वाचाः

टीव्हीत ३ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज
या टीव्हीच्या ५५ इंचाच्या पॅनेलचे रिझॉल्यूशन 3840×2160 पिक्सल आहे. ५५ इंचाच्या ४के मॉडल डॉल्बी व्हिजन, HDR10/10+ आणि एचएलजी समेत एचडीआरला सपोर्ट करते. वनप्लस या पूर्ण पॅकेजला मुव्ही स्टाईल डिस्प्ले म्हणतो. वनप्लस टीव्ही यू सीरीज डेडिकेटेड गामा इंजिन देण्यात आले आहे. वनप्लस टीव्ही यू१ मध्ये क्वॉड – कोर मीडियाटेक MT5887 चिपसेट दिला आहे. टीव्हीत ३ जीबी रॅम प्लस १६ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here