नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी ५ ऑगस्ट रोजी गॅलेक्सी अनपॅक्ड () इव्हेंटचे आयोजन करीत आहे. याची घोषणा सॅमसंगने स्वतः केली आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात कंपनी आपल्या प्रीमियम स्मार्टफोनची लाँचिंग करणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कंपनीच्या वेबसाइटवर कार्यक्रम लाइव्ह पाहता येणार आहे.

वाचाः

एकाचवेळी लाँच होऊ शकतात ५ स्मार्टफोन
सॅमसंग कंपनी यावेळी एकाचवेळी ५ स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट २० सीरीज अंतर्गत हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. तसेच नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy आणि Galaxy Z Flip स्मार्टफोनचे ५ जी व्हेरियंट लाँच करु शकते. सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन गॅलेक्सी नोट २०, गॅलेक्सी नोट २० प्लस आणि गॅलेक्सी नोट २० अल्ट्रा लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

कशी असेल गॅलेक्सी नोट २० सीरीज
या सीरीज अंतर्गत तिन्ही मॉडल्स कॅमेरा आणि बॅटरीमध्ये वेगवेगळी असू शकते. यात स्नॅपड्रॅगन ८६५ प्लस किंवा Exynos 992 प्रोसेसर मिळू शकतो. तसेच या फोनमध्ये इनफिनिटी O डिस्प्ले आणि 120Hz चे रिफ्रेश रेट सोबत येईल. टिप्स्टर iceuniverse च्या माहितीनुसार, या सीरीजची किंमत ९९९ डॉलर (जवळपास ७४ हजार ३०० रुपये) पासून १२९९ डॉलर या दरम्यान किंमत असू शकते.

वाचाः

१०८ मेगापिक्सलचा कॅमेरा
एका रिपोर्टच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट २० सीरीजचा सर्वात महाग मॉडल म्हणजे नोट २० अल्ट्रा मध्ये १०८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळू शकतो. नुकतीच या फोनचा एक फोटो समोर आला होता. यावरून यात ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जाणार आहे. रियर कॅमेऱ्यात 50x झूम सोबत पेरिस्कोप सेन्सर मिळू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here