तात्काळ तिकीट

अनेकदा रिझर्व्हेशन आधीच फुल होते. त्यामुळे तिकीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे नाइलाजाने तात्काळ तिकीट बुकिंग करावे लागते. परंतु, तात्काळ तिकीट मध्ये सुद्धा प्रत्येकालाच कन्फर्म तिकीट मिळत नाही. अनेक जणांना वेटिंग लिस्ट मध्ये तिकीट मिळते. त्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीने तिकीट बुकिंग केली आहे. याला खूप महत्त्व आहे. सर्वात आधी हे जाणून घ्या की, तात्काळ कोटा सकाळी १० वाजता ओपन केला जातो. तर स्लिपर कोचसाठी तात्काळ बुकिंग सकाळी ११ वाजेपासून सुरू होते.
वाचाः iPhone 14 यूजर्स पुन्हा एकदा त्रस्त, कॅमेराच्या समस्येनंतर आता ही समस्या आली समोर
सर्वात आधी लिस्ट बनवा

तुम्हाला जर रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुम्ही सर्वात आधी किती लोक रेल्वेने प्रवास करणार आहात, याची लिस्ट बनवा. सर्वांची नावे, त्यांची वय, लिंग यांची सविस्तर माहिती आधीच लिहून ठेवा. IRCTC वर आपल्या अकाउंटवर बनवलेल्या प्रोफाइल सेक्शन मध्ये ही लिस्ट बनवता येवू शकते. ही लिस्ट आधीच बनवली गेली तर तिकीट बुकिंग वेळी ही माहिती पुन्हा भरावी लागणार नाही. तसेच तुमचा वेळ सुद्धा वाचू शकतो.
वाचाः ४२ हजारात iPhone 13 आणि ३७ हजारात iPhone 12, उद्या सेलचा अखेरचा दिवस
लॉग इन करून राहा तयार

रेल्वेने तिकीट काढताना नेहमी अलर्ट राहणे गरजेचे आहे. तात्काळ तिकीट बुकिंग होण्याची वाट पाहू नका. त्याआधीच आपल्या आयडीवरून लॉग इन करा. आयडी लॉगिन सोबत रेल्वे मार्ग, स्टेशन कोड, बर्थ सिलेक्शन सारखी डिटेल्स आधी भरून ठेवा. तात्काळ कोटा ओपन होताच आधी सेव्ह करून ठेवलेल्या प्रवाशांची नावे आणि पेमेंट मोड वर जावून तिकीट बुक करा.
वाचाः विदेशातून फोन आणणं सोप्पं नाही, मोदी सरकारने आणला नवा नियम, १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार
बँक डिटेल्स आणि सीव्हीव्ही समोर ठेवा

प्रवाशाची लिस्ट आधीच बनवून ठेवा. तसेच समोर आयडी लॉगिन मध्ये डिटेल्स आधीच भरून ठेवून आपला वेळ वाचवा. परंतु, ज्यावेळी पेमेंटची वेळ येते. त्यावेळी अनेक जण गोंधळून जातात. अनेक जण नर्व्हस होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या बँकेची डिटेल्स आधीच तयार करून ठेवा. जर शक्य असेल तर कुणाला तरी आपल्या मदतीला घ्या. तो सांगेल आणि तुम्ही लगेच टाइप करा. ज्या नंबरवर ओटीपी येणार आहे तो फोन अनलॉक करून आपल्या जवळ ठेवा.
वाचाः लाँचिंगआधीच समोर आले JioPhone 5G चे स्पेसिफिकेशन्स, जबरदस्त आहेत फीचर
ओटीपी विना करा पेमेंट

ज्यावेळी बँकिंग डिटेल्स टाकून पेमेंट केली जाते त्यावेळी रजिस्टर्ड मोबाइल नंबर वर ओटीपी येईल. ज्याला व्हेरिफाय करून तुम्ही पेमेंट करू शकता. IRCTC वर पेमेंट करून याद्वारे ज्यात इंटरनेट बँकिंग, वॉलेट व यूपीआय इत्यादीचा समावेश आहे. परंतु, जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर यूपीआय बेस्ट ऑप्शन आहे. या पद्धतीने यूपीआय पासवर्ड टाकावा लागतो. याला ओटीपीची गरज पडत नाही.
वाचा: OnePlus चा दिवाळी सेल ! स्वस्तात घरी येईल ‘हा’ पॉवरफुल 5G स्मार्टफोन, मिळतोय ११ हजारांपर्यंतचा ऑफ
इंटरनेट स्पीड

वर सांगितलेल्या सर्व प्रोसेस तुम्ही खूपच काळजीपूर्वक आणि स्मार्टपणे करू शकाल. परंतु, जर तुमच्या इंटरनेटने तुम्हाला धोका दिला तर तुमची सर्व मेहनत वाया जावू शकते. त्यामुळे तुम्हाला सल्ला आहे की, सर्वात आधी हे सुनिश्चित करा की, तुमचे इंटरनेट कनेक्शन चांगले आहे. ज्या ठिकाणी तुमची इंटरनेट स्पीड चांगली आहे त्याच ठिकाणी बसून तुम्ही बुकिंग सुरू करा. एकाच सिस्टम आणि ब्राउजरने आपली आयडी लॉगिन करा, हे फायदेशीर राहिल.
वाचाः Amazon वरील स्मार्टफोन ऑफर्सने जिंकली ग्राहकांची मनं, खरेदीसाठी गर्दी, पाहा लिस्ट
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times