नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung) ने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार सेल आणला आहे. याअंतर्गत कंपनी आपल्या ग्राहकांना स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी देत आहेत. कंपनीचा सेलला आज सुरुवात होत आहे. या सेलचे नाव आहे. या फोनला अर्ध्या किंमतीत खरेदी संधी मिळणार आहे. परंतु, ती केवळ ३ निवडक ग्राहकांना मिळणार आहे. सॅमसंगचा हा सेल आज दुपारी १२ वाजेपासून ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

काय आहे सॅमसंगची ऑफर?
कंपनीने सांगितले की, सॅमसंगचा फ्लिप स्मार्टफोन गॅलेक्सी झेड फ्लिप खरेदी करणाऱ्या ३ लकी ग्राहकांना ५० टक्के कॅशबॅक परत दिला जाणार आहे. या सेलचे आयोजन कंपनीची वेबसाईट Samsung.com वर सुरू होईल. तसेच फोन खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना एका वर्षापर्यंत वन टाईम एक्सीडेंटल डॅमेज प्रोटेक्शन दिला जाणार आहे. तसेच ग्राहकांना झीरो कॉस्टवर गॅलेक्सी Assured प्लान दिला जाणार आहे. या अंतर्गत फोन परत करणाऱ्या ग्राहकांना ७० टक्क्यांपर्यंत किंमत परत मिळू शकते.

वाचाः

दुसऱ्या प्रोडक्ट्सवर सुद्धा जबरदस्त ऑफर
सेल अंतर्गत कंपनी खूप साऱ्या उत्पादनावर, स्मार्टफोन, वेयरेबल्स, टेबलेट्स आणि अक्सेसरीज़ आदीवर जबरदस्त ऑफर्स मिळत आहे. या ऑफर्स अंतर्गत HDFC, ICICI आणि Citibank च्या क्रेडिट व डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास ६ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि जुन्या स्मार्टफोनवर ८ हजारांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळू शकतो. स्पेशल बेनेफिट्स मिळवण्यासाठी ग्राहक आपल्या मित्र, नातेवाईकांना रेफर करू शकतो.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी Z Flip चे खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डायनामिक अमोलेड इनफिनिटी फ्लेक्स डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तो फोल्ड होतो. फोनमध्ये १.१ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले मिळतो. यात ८ जीबी रॅम, २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये 12 +12 मेगपिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 3300mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत १ लाख ८ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here