Google Features: युजर्सना अधिकाधिक चांगली सेवा मिळावी हाच नेहमी Google चा प्रयत्न असतो. युजर्सना कोणत्या फीचर्सचा अधिक फायदा होईलआणि त्यांचे काम अधिक सोपे होईल याकडे देखील कंपनी विशेष लक्ष देते. अशात टेक जायंट सर्च इंजिन गुगलने ९ भन्नाट फीचर्सची घोषणा केली आहे. हे नवीन फीचर लाँच केल्यानंतर गुगल युजर्सना उत्तम युजर अनुभव मिळेल. म्हणजे तुम्हाला गुगल कडून खरेदीचा उत्तम अनुभव मिळेल. युजर्सना खरेदीचे ठिकाण ते नवीन ट्रेडिंग शॉपिंगसह अनेक प्रकारची माहिती मिळेल. मात्र, हे फिचर्स प्रथम अमेरिकेत उपलब्ध करून दिले जातील. यात कंपनी Trend Shopping हे शोध फीचर देखील ऑफर करणार आहे. जे लोकप्रिय उत्पादनांची यादी युजर्सना दाखवेल. तसेच, खरेदीसाठी नवीन फिल्टर्स देखील यात असतील, जे रियल-टाइम शोध ट्रेंड देईल.चला तर मग जाणून घेऊया या फीचर्स आणि त्यांच्या फायदयांबद्दल सविस्तर.

Shopping Filter

shopping-filter

Shopping Filter: खरेदीसाठी नवीन फिल्टर्स असतील, जे रियल-टाइम शोध ट्रेंड देईल. म्हणजे जर तुम्हाला जीन्स खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला रुंद पाय आणि बूटकटचे लोकप्रिय ट्रेंड सापडतील. अधिक शॉपिंग करणाऱ्या युजर्सना हे Shopping Filter फीचर नक्कीच आवडेल.

Search Box: Google App मध्ये डिस्कव्हर वापरून युजर स्टाईल आधारित खरेदी करता येईल. तसेच, गुगल मॅपमध्ये सुधारणा करण्यासाठी कंपनी लवकरच त्यात नवीन फीचर्स समाविष्ट करणार आहे आणि सर्चमध्ये सुधारणा करण्यावर काम करत आहे.

वाचा :PAN Card हरविले तरी कामं रखडणार नाही, असे करा ड्युप्लिकेट कार्डसाठी अप्लाय, पाहा स्टेप्स

Shopping Link

shopping-link

Shopping Link: एखाद्या प्रोडक्टविषयी सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर हे फीचर खूप कामी येईल. कारण, गुगल अॅपच्या या फीचरच्या मदतीने युजर्सना प्रोडक्टची सविस्तर माहिती मिळेल, प्रोडक्टमध्ये काय दोष आहे आणि चांगले आहे. यासोबतच उत्पादनाच्या रेटिंगचीही माहिती मिळणार आहे. गुगल पेज इनसाइट्स फीचर येत्या महिन्यात यूएस मध्ये लाँच केले जाईल.

पर्सनल रिझल्ट्स: युजर्सना लवकरच पर्सनल शॉपिंग रिझल्ट्स मिळतील. यामध्ये, युजर्स त्यांची स्वतःची खरेदी सूची तयार करू शकतील, ज्यामुळे ते Personal Results सहजपणे नियंत्रित करू शकतील.

वाचाAmazon-Flipkart सेलमध्ये अवघ्या १०० रुपयांत मिळताहेत ‘हे’ भन्नाट प्रोडक्टस, स्मार्टफोन युजर्ससाठी खूपच कामाचे

​3D Shopping

3d-shopping

3D Shopping : कंपनी आणखी एक भन्नाट फीचर युजर्ससाठी आणणार आहे. Google कडून मशीन लर्निंगसाठी 3D व्हिज्युअल सपोर्ट प्रदान केला जाईल. त्याच्या मदतीने, उत्पादन 360 अंशांपर्यंत फिरण्यास सक्षम असेल. नवीन श्रेणी येत्या महिन्यात लवकरच उपलब्ध होईल.

Shopping Insights: या Shopping Insights च्या मदतीने, युजर्सना उपयुक्त Insight मिळेल, जे खरेदी करण्यात मदत करेल. यामध्ये यूजर्सना अनेक प्रकारच्या कॅटेगरी मिळतील. यामुळे युजर्सना खरेदी करणे सोपे होणार आहे. Google Insights लवकरच यूएस मध्ये लॉन्च होईल.

वाचा: Amazon वरील स्मार्टफोन ऑफर्सने जिंकली ग्राहकांची मनं, खरेदीसाठी गर्दी, पाहा लिस्ट

Shop The Look

shop-the-look

Shop The Look: हे फीचर यूजर्सना परफेक्ट आउटफिट देईल. म्हणजे जर तुम्ही बंबर जॅकेट शोधले तर हे टूल बंबर जॅकेट असलेली इमेज दाखवेल. कॉम्प्लीमेंट्री पीस कोठे खरेदी करू शकतो? तुम्ही ही माहिती मिळवू शकाल.हे फीचर देखील युजर्सच्या खूप कामी येईल.

Trending Shopping : युजर्सचा अनुभव अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी Google कायमच प्रयत्नशील असते. कंपनीचे Trending Shopping हे शोध फीचर लोकप्रिय उत्पादनांची यादी दर्शवेल. जे युजर्सना नवीन मॉडेल, शैली आणि ब्रँडची माहिती देईल.

​Google Word Shop

google-word-shop

Google Word Shop: Google च्या Word Shop वैशिष्ट्याच्या मदतीने, product फीडमध्ये खरेदी आयटमचे व्हिज्युअल दिसेल. तसेच, तुम्ही जवळच्या इन्व्हेंटरीबद्दल माहिती मिळवण्यास सक्षम असाल. google च्या या Word Shop फीचरमध्ये इलेक्ट्रॉनिक, ब्युटी आणि मोबाईल उत्पादने खरेदी करता येणार आहेत. तसेच , Google लॉस एंजेलिस, लंडन आणि न्यूयॉर्क शहरात इमर्सिव्ह व्ह्यू ऑफर करेल. तर येत्या काही दिवसांत ते सॅन फ्रान्सिस्को आणि टोकियोमध्येही सादर केले जाणार आहे. यासोबतच गुगलने आपल्या गुगल लेन्समध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याच्या मदतीने इमेज आणि टेक्स्टच्या मदतीने सर्चही करता येईल.

वाचा: वेगळ्या रिचार्जची नाही गरज, या Jio प्लान्समध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह Disney +Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here