नवी दिल्लीः आपला स्वस्तातील स्मार्टफोन घेऊन येत असल्याचे अनेक रिपोर्ट्स समोर आले आहेत. आता पर्यंत समोर आलेल्या रिपोर्टमध्ये याची किंमत आणि कॅमेऱ्यापर्यंतची माहिती लीक झाली आहे. रोमानियाच्या एका रिटेलर evoMAG.ro च्या माहितीनुसार या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. याआधी लीक झालेल्या ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल, असा दावा केला होता.

वाचाः

किंमत किती असणार?
कंपनीने एक प्रोमो व्हिडिओतून सांगितले होते की, या फोनची लाँचिंग २१ जुलै रोजी केली जाणार आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी मॉडलची किंमत ३९ हजार रुपये असू शकते. भारतीय बाजारात या फोनची किंमत किती असू शकते याची माहिती लाँचिंग दरम्यान स्पष्ट होईल.

वाचाः

स्मार्टफोनमध्ये काय खास असू शकते
रिटेलरने फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना सांगितले की, एका रिपोर्टच्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६.५५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. यात तुम्हाला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी प्रोसेसर मिळेल. तसेच फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी दिली जावू शकते.

वाचाः

हा फोन ५जी सपोर्ट असणार आहे. कॅमेऱ्याचे दोन दावे करण्यात आले आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले की, ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे. तर आता नव्याने आलेल्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जावू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here