नवी दिल्लीः अँड्रॉयड स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात अनेक फीचर्स आणि सेटिंग्स मिळतात. अनेक फीचर्स तर असे असतात जे आपल्या फोनमध्ये असतात परंतु, त्या फीचर्स बद्दल आपल्याला माहिती नसते. ज्या व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतात त्यांच्यासाठी हे खास फीचर्स आहे. ज्या फीचरची आपण चर्चा करीत आहोत. त्याचे नाव Pin the Screen () किंवा आहे.

वाचाः

या फीचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे फोन अनलॉक असला तरी कोणीही तुमच्या परवानगी विना फोनचा वापर करू शकणार नाही. हे फीचर अँड्रॉयड 5.0 व्हर्जन नंतर सर्व मध्ये मिळते.

वाचाः

काय आहे या फीचरचे काम
या फीचर द्वारे तुम्ही कोणत्याही अॅपला स्क्रीनवर लॉक-पिन करू शकता. त्यानंतर दुसऱ्या अॅपमध्ये जाण्यासाठी लॉकस्क्रीन पासवर्डची गरज लागते. हे फीचर ज्यावेळी खास ठरू शकते. ज्यावेळी तुम्हाला तुमचा फोन अन्य दुसऱ्या व्यक्तीकडे द्यावा लागत असेल. अनेकदा फोन दुसऱ्यांच्या हातात दिल्यास ते अनेक अॅप्समध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे अशा वेळी हे फीचर खूप कामी येते. तुमच्या परवानगी विना कुणालाही कोणत्याही अॅप्समध्ये जाता येत नाही.

वाचाः

कसा कराल याचा वापर

>> सर्वात आधी स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा.
>> आता Security & Locations या ऑप्शनमध्ये जा. या ठिकाणी Advanced चा पर्याय दिसेल.
>> या पर्यायामध्ये तुम्हाला Screen Pinning चे ऑप्शन दिसेल. यावर टॅप करा.
>> जर हे Off असेल तर याला On करा.
>> आता ज्या अॅपला पिन करायचे आहे. त्याला ओपन करा. पुन्हा Recent Apps च्या ऑप्शनवर जा.
>> आता अॅपवर लॉग इन प्रेस करा. आणि Pin च्या ऑप्शनला निवडा.
>> पुन्हा दुसऱ्या अॅपवर जाण्यासाठी Home आणि Back बटनसोबत दाबावे लागेल. आणि लॉकस्क्रीन पासवर्डचा वापर करावा लागेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here