वाचाः
भारतातील किंमत आणि सेल
Lava Z61 Pro ची किंमत भारतीय मार्केटमध्ये ५ हजार ७७४ रुपये ठेवण्यात आली आहे. २ जीबी रॅम असलेला हा फोन दोन ग्रेडिएंट फिनिश मिडनाईट ब्लू आणि एंबर रेड मध्ये खरेदी करता येवू शकतो. लावाकडून सांगण्यात आले आहे की, हा फोन फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनशिवाय ऑफलाइन स्टोर्सवरून सुद्धा पुढच्या आठवड्यापासून खरेदी करता येवू शकेल.
वाचाः
Lava Z61 Pro ची वैशिष्ट्ये
लावाच्या या फोनमध्ये ड्युल सिम कार्ड देण्यात आले. स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच वर आणि खाली रुंद बेजल्स दिले आहेत. फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येवू शकतो.
वाचाः
या फोनमध्ये रियर पॅनेलवर एलईडी सोबत ८ मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा सेंन्सर दिला आहे. तसे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा टॉप बेजल दिला आहे. कॅमेऱ्याच्या फीचर्समध्ये बोकेह मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा आणि फिल्टर्स वैगरे यांचा समावेश आहे. फोनमध्ये 3,100mAh ची बॅटरी दिली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times