वाचाः
फोनची किंमत आणि ऑफर्स
या स्मार्टफोनच्या 3GB + 32GB मॉडलची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर 4GB + 64GB मॉडलच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट या रंगात उपलब्ध आहे. या फोनवरील ऑफर अंतर्गत Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डवरून फोन खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तसेच ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय चा पर्याय सुद्धा दिला आहे.
वाचाः
रियलमी चे वैशिष्ट्ये
अँड्रॉयड १० वर चालणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनचा रिझॉल्य़ूशन 720×1,600 पिक्सल आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. तसेच ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो जी ७० प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे.
रियर कॅमेऱ्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. यात रिव्हर्स चार्जिंग फीचर सुद्धा दिले आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/A-जीपीएस आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यासारखे फीचर देण्यात आले आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times