नवी दिल्लीः पोकोने नुकताच भारतात स्मार्टफोन लाँच केला आहे. परंतु, भारतात चायनीज अॅपवर बंदी घातल्याच्या कारणाने हा फोन चर्चेत आला आहे. फोनच्या रिव्ह्यू युनिटमध्ये चीनचा प्रसिद्ध अॅप हेलो आधीच देण्यात आला होता. त्यावर वाद झाल्याने कंपनीने स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. भारत सरकारने नुकतीच ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. ज्यात सोशल मीडिया अॅप हेलोचा समावेश आहे.

वाचाः

टेक ब्लॉगर अभिषेक भटनागर यांनी आपल्या एका व्हिडिओतून हा मुद्दा उपस्थित केला होता. M2 Pro मध्ये हेलो अॅपसोबत एक अन्य सिक्योरिटी अॅपवर सुद्धा प्रश्न उपस्थित केला आहे. या सिक्योरिटी अॅपला खूप सारे अॅक्सेस दिले आहेत. तसेच फोनमध्ये एक आणि बंदी घातलेला अॅप Clean Master सुद्धा देण्यात आला आहे.

वाचाः

कंपनीचे स्पष्टीकरण
पोकोने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, ज्या स्मार्टफोन युनिटची चर्चा केली जात आहे. त्याचे सॉफ्टवेयर व्हर्जन आणि उत्पादन भारत सरकारच्या निर्णया आधी सुरू झाले होते. कंपनीने सॉफ्टवेयर अपडेट करून ही समस्या दूर केली आहे. पोकोने म्हटले की भारत सरकारकडून बंदी घालण्यात आलेला कोणत्याही अॅप सोबत कंपनी यूजरचा डेटा शेअर करीत नाही. त्यामुळे युजरचा डेटा सुरक्षित आहे.

वाचाः

Poco M2 Pro ची वैशिष्ट्ये
भारतात या फोनला १३ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये 48MP + 8MP + 5MP + 2MP का क्वाड रियर कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे. हा फोन 4GB + 64GB और 6GB + 64GB च्या स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here