नवी दिल्लीः प्रसिद्ध टेक्नोलॉजी कंपनी रियलमी लवकरच 100W+ वॅट हून अधिक जास्त चार्जिंग टेक्नोलॉजी घेवून येत आहे, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. प्रसिद्ध टिप्स्टर इशान अग्रवाल यांनी सांगितले की, जुलै महिन्यात हे फीचर कंपनी घेऊन येवू शकते. या नंतर फोन चार्ज होण्यास केवळ काही मिनिट लागतील. याआधी शाओमीच्या बाबतीतही काही रिपोर्ट्स लीक झाले होते. परंतु, रियलमी सर्वात आधी याची लाँचिंग करू शकते.

वाचाः

३ मिनिटात ३३ टक्क्यांहून अधिक चार्ज
रिपोर्टच्या माहितीनुसार, टेक्नोलॉजीला अल्ट्रा डार्ट (Ultra Dart) चार्ज चार्जिंग म्हटले आहे. हे 4000mAh ची बॅटरी तीन मिनिटात ३३ टक्के चार्ज होऊ शकते. परंतु, सर्वात आधी ही टेक्नोलॉजी कोणत्या फोनमध्ये दिली जाणार आहे, याची माहिती अद्याप उघड झाली नाही.

वाचाः

१७ मिनिटात फुल चार्ज होणार बॅटरी
मार्चमध्ये एक रिपोर्ट समोर आली होती. शाओमी सुद्धा 100W फास्ट चार्जिंगवर काम करीत असल्याची माहिती देण्यात आली होती. शाओमीचा सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंगवरून 4000mAh ची बॅटरी केवळ १७ मिनिटात फुल चार्ज होऊ शकते, असा दावा करण्यात येतोय. ही टेक्नोलॉजी कंपनीच्या Xiaomi Mi Mix 4 स्मार्टफोनमध्ये दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या ६५ वॅट फास्ट चार्जिंगवरून 4000mAh ची बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी अर्धा तास लागतो. ही टेक्नोलॉजी ओप्पो कंपनीने आणली आहे.

वाचाः

लिनोओ कडून सुद्धा दावा करण्यात आला आहे की, याचा पहिला Lenovo Lehion फोन 90W फास्ट चार्जिंग सोबत लाँच होणार आहे. तसेच काही रिपोर्टमधून हेही सांगण्यात आले आहे की, नवीन Black Shark स्मार्टफोन मध्ये जगातील पहिला फास्ट चार्जिंग पाहायला मिळू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here