नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी ने नुकताच ५९९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लान वर्क फ्रॉम होम (Work From Home Plan) आणला आहे. बीएसएनएल युजर्ससाठी ५९९ रुपयांचा प्लान असला तरी व्होडाफोन आणि जिओकडे ५९९ रुपयांचे प्लान आधीच आहेत. जाणून घ्या ५९९ रुपयांच्या प्लानसंबंधी.

वाचाः

BSNLचा ५९९ रुपयांचा प्लान
बीएसएनएलच्या या प्लानमध्ये रोज ५ जीबी डेटा मिळतो. युजर्स MTNL सह अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकतात. तसेच या प्लानमध्ये रोज १०० फ्री SMS मिळतात. या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे.

चा ५९९ रुपयांचा प्लान
या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. यात रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या ऑफर अंतर्गत कंपनी ५ जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. युजर्सला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच 100 SMS आणि Zee5 व व्होडाफोन प्लेचे फ्री सब्सक्रिप्शन मिळतात.

वाचाः

चा ५९९ रुपयांचा प्लान
जिओ आपल्या ग्राहकांना या प्लान अंतर्गत रोज २ जीबी डेटा ऑफर करते. यात जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच रोज 100 SMS आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते.

वाचाः

चा ५९८ रुपयांचा प्लान
एअरटेल सुद्धा व्होडाफोन सारखा प्लान ऑफर करतेय. या प्लानची किंमत ५९८ रुपये आहे. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. युजर्संना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here