नवी दिल्लीः प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सेल लाइव्ह झाली आहे. आजपासून सुरू झालेला हा सेल या साईटवर १३ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान ग्राहकांना कंपनीच्या स्मार्टफोन्सवर खूप साऱ्या ऑफर्स मिळत आहेत. चार दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ग्राहकांना , आणि यासारख्या ओप्पोच्या स्मार्टफोन्सवर सूट मिळत आहे.

वाचाः

फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या या सेलमध्ये Oppo A9 2020 ला १३ हजार ९९० रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा एआय क्वॉड कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. Oppo A5s हा फोन ग्राहकांना खरेदी करायचा असेल तर यासाठी या सेलमध्ये ८ हजार ९९० रुपये किंमत मोजावी लागेल. ही किंमत २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची आहे. या फोनमध्ये 4230mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच कॉर्निंग ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे.

वाचाः

२० हजारांपेक्षा कमी किंमतीत ८ जीबी रॅम
Oppo A9 चा ४ जीबी रॅम मॉडलची किंमत १२ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. 4200mAh ची बॅटरी दिली आहे. Oppo F9 Pro मध्ये ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. फोनच्या रियरवर ड्यूल कॅमेरा दिला आहे. तसेच २५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या सेलमध्ये या फोनची किंमत १४ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ८ जीबी रॅमचा Oppo F15 फोन या सेलमध्ये १८ हजार ९९० रुपयात खरेदी केला जावू शकतो.

वाचाः

Reno 3 Pro वर डिस्काउंट
नुकताच लाँच करण्यात आलेला Oppo Reno 3 Pro हा फोन या सेलमध्ये २९ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. या फोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले आणि 4025mAh ची बॅटरी दिली आहे. Oppo F11 Pro ग्राहकांना १६ हजार ९९० रुपयांत खरेदी करण्याची संधी आहे. तर Oppo A12 या फोनमध्ये ड्यूल कॅमेरा आणि 4230mAh बॅटरी सोबत ९ हजार ९९० रुपयात खरेदी करता येवू शकतो. Oppo A11K या फोनची किंमत या सेलमध्ये ८ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here