Best Prepaid Plans Under 300: भारतीय दूरसंचार बाजारात, तिन्ही कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) त्यांच्या युजर्सना कमी किमतीत अनेक प्रीपेड प्लानसह रिचार्ज करण्याचा पर्याय देतात. जर तुम्हाला महागडे रिचार्ज प्लान्स खरेदी करायचे नसतील, तर सर्व ऑपरेटर फक्त ३०० रुपयांपेक्षा कमी मध्ये अनेक पर्याय ऑफर करत आहेत. डेटा व्यतिरिक्त, हे प्लान मोफत कॉलिंग आणि एसएमएस मेसेज सारखे फायदे देखील देतात. यापैकी काही प्लान्समध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह एकूण ५६ GB (२ GB दररोज) डेटा उपलब्ध आहे. तर, काहींमध्ये अमर्यादित कॉल, प्रतिदिन १०० एसएमएस आणि Jio अॅप्सचे सदस्यत्व यांसारख्या फायद्यांचाही समावेश आहे. एयरटेलचे स्वस्त प्लान्स Apollo 24|7 सर्कल, Fastag वर १०० रुपये मोफत कॅशबॅक, मोफत HelloTunes आणि Wynk Music मध्ये प्रवेश देतात . पाहा पूर्ण लिस्ट.

Vi Plans

vi-plans

१९९ रुपयांचा प्लान : या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग, १ GB दैनिक डेटा आणि १०० SMS प्रतिदिन उपलब्ध आहेत. Vi Movies आणि TV ला प्रवेश देणारी प्लान १८ दिवसांच्या वैधतेसह येतो.

२१९ रुपयांचा प्लान : अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि १ GB डेटासह हा प्लान २१ दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त लाभ म्हणून, Vi Movies & TV वर प्रवेश प्रदान केला आहे.

२४९ रुपयांचा प्लान : २१ दिवसांच्या वैधतेसह या प्रीपेड प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज १.५ GB डेटा. या प्लानमध्ये Vi Movies आणि TV प्रवेश देखील उपलब्ध आहे.

वाचा :5G Smartphone खरेदी करताना डोक्यात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा स्पीड मिळेल 4G पेक्षा कमी

Jio 239 Plan

jio-239-plan

२३९ रुपयांचा प्लान : अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज १.५ GB डेटा ऑफर करतो. यामध्ये Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनही देण्यात आले आहे.

२४९ रुपयांचा प्लान: २३ दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन यांसारखे फायदे देखील समाविष्ट आहेत.

२५९ रुपयांचा प्लान: जर दररोज १.५ GB डेटा आवश्यक असेल, तर हा रिचार्ज केला जाऊ शकतो. ३० दिवसांच्या वैधतेसह या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि Jio अॅप्सचे विनामूल्य सदस्यता देखील मिळते.

वाचा: Flipkart Sale : अर्ध्या किमतीत मिळणार iPhone, Samsung सह अनेक ब्रँडेड फोनवरही डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Jio 149 Plan

jio-149-plan

१४९ रुपयांचा प्लान: २० दिवसांची वैधता असलेला हा प्लान १ GB दैनंदिन डेटा ऑफर करतो. सोबतच यामध्ये अमर्यादित कॉल देखील करता येतील. तसेच, प्लान १०० SMS दररोज आणि Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.

१७९ रुपयांचा प्लान : या प्लानमध्ये दररोज १ GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० SMS आणि Jio अॅप्सचा मोफत प्रवेश उपलब्ध आहे. त्याची वैधता २४ दिवस आहे.

१९९ रुपयांचा प्लान: १९९ रुपयांचा प्लान २३ दिवसांच्या वैधतेसह येतो आणि दररोज १.५ GB डेटा ऑफर करतो. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस सारख्या फायद्यांव्यतिरिक्त, ते Jio अॅप्सचे सदस्यता देखील देते.

वाचा : 5G Smartphone खरेदी करताना डोक्यात ठेवा ‘या’ गोष्टी, अन्यथा स्पीड मिळेल 4G पेक्षा कमी

Airtel 299 Plan

airtel-299-plan

२९९ रुपयांचा प्लान: एअरटेलकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीत हा प्लान देखील तुम्ही खरेदी करू शकता. तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असल्यास, यामध्ये डेटाची सुविधा देखील मिळेल. प्लानमध्ये १.५ GB दैनिक डेटा मिळेल. हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. हे Xstream मोबाइल पॅक फायदे, Apollo 24 | 7 सर्कल, Fastag वर १०० रुपये मोफत कॅशबॅक, मोफत Hello Tunes आणि Wynk Music मध्ये प्रवेश देते. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळत आहे.

Airtel 239 Plan

airtel-239-plan

२३९ रुपयांचा प्लान: एअरटेलकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे अनेक प्लान्स आहेत. यापैकीच एक आहे २३९ रुपयांचा प्लान, एअरटेलच्या या स्वस्त प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. एअरटेलचा २३९ रुपयांचा प्लान २४ दिवसांच्या वैधतेसह १ GB दैनिक डेटा, मोफत HelloTunes आणि Wynk Music ऍक्सेस यांसारख्या फायद्यांसह येतो.

२६५ रुपयांचा प्लान: २८ दिवसांच्या वैधतेच्या या प्लानमध्ये दररोज १ GB डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिकचा अ‍ॅक्सेस देण्यात आला आहे.

वाचा: १००० रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळतोय १४ हजार रुपये किमतीचा Realme C35, पाहा ऑफर्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here