वाचाः
किंमत किती असू शकते?
कंपनीने आपल्या ट्विटर हँडलवरून याची झलक जारी केली आहे. दिसायला याचा लूक एका कुलूपासारखा आहे. यात देण्यात आलेला डिस्प्ले PSI (पाउंड पर स्क्वायर इंच) लेवलचा आहे. शाओमीचा या सारखा पंप आधीच युके मार्केटमध्ये उपलब्ध आहे. शाओमीच्या यूके वेबसाईटवर याची किंमत ३९.९९ पौंड (जवळपास ३७०० रुपये) आहे. भारतात याची किंमत जवळपास हिच राहण्याची शक्यता आहे. हे ब्लॅक कलरमध्ये येईल.
वाचाः
फीचर्स
एमआय पोर्टेबल इलेक्ट्रिक एयर कंप्रेसरवरून तुम्ही सायकलचे टायर, फुटबॉल, मोटरसायकलचे टायर आदीमध्ये हवा भरू शकता. तसेच यावरून तुम्ही दैनंदिन हवा चेक करू शकता. यावरून टायरची देखरेख करू शकता. हे डिव्हाइस साईजमध्ये खूप कॉम्पॅक्ट आहे. ज्याला कुठेही सोबत घेऊन जाता येते. युजर्स सायकलिंग करताना संकटसमयी याला आपल्या सोबत ठेवू शकता.
वाचाः
एअर कंप्रेसरमध्ये एलईडी लाईट देण्यात आली आहे. अंधारात याचा वापर करता येवू शकतो. यात 2,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याला मायक्रो एसडी यूएसबी चार्जिंग सपोर्ट पोर्ट देण्यात आल्याने चार्ज करता येवू शकते. कंपनीचा दावा आहे की फुल चार्ज झाल्यानंतर हे तीन तास काम करते.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times