Top Post paid Plans: Reliance Jio, Airtel आणि Vodafone- Idea कडे प्रत्येक श्रेणीमध्ये पोस्टपेड प्लान्स आहेत. ज्यामध्ये हाय -स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि OTT Apps ची सदस्यता आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन पोस्टपेड प्लान घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनेक स्वस्त प्लान्स या तिन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. यामध्ये काही प्लान्समध्ये मध्ये नेटफ्लिक्स, Amazon Prime , जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि क्लाउडचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.. सोबत डेटा युजर्सना भरपूर डेटा देखील मिळतो. तर काहींमध्ये दररोज ७५ GB डेटाचा लाभ तुम्हाला मिळेल. अधिक SMS पाठविणाऱ्यांसाठी १०० SMS ची सुविधा देखील यापैकी काही प्लान्समध्ये उपलब्ध असेल. विशेष म्हणजे या प्लान्सच्या किमती देखील जास्त नाही. चला तर मग जाणून घेऊया प्लान्सबद्दल सविस्तर. एक नजर टाकूया.या पोस्टपेड प्लान्सवर.

VI 499 Plan

vi-499-plan

Vodafone-Idea चा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: तुमचे बजेट जर थोडे जास्त असेल आणि तुम्ही जर Vodafone Idea युजर असाल तर तुमच्यासाठी vodafone-idea कडे एक भन्नाट प्लान आहे . Vodafone – Idea च्या ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज ७५ GB डेटा आणि १०० SMS चा लाभ युजर्सना घेता येतो. यासोबतच पोस्टपेड प्लानमध्ये Amazon Prime आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन दिले जाते. Plan २०० GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील देते.

वाचा : ‘या’ भन्नाट सेलमध्ये iPhone 12, OnePlus Nord 2T, Pixel 6a वर २२ हजारांपेक्षा अधिक सेव्हिंग होणार

VI 399 Plan

vi-399-plan

Vodafone- Idea चा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान : Vodafone Idea ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. VI कंपनी युजर्सना एकापेक्षा जबरदस्त प्लान्स ऑफर करते. Vodafone Idea च्या ३९९ रुपयांच्या प्लानमध्ये ४० GB डेटासोबत 50 GB अतिरिक्त डेटा देते. तसेच, हा प्लान अमर्यादित कॉलिंग देखील ऑफर करतो. डेटा रोलओव्हर आणि दररोज 100 SMS ऑफर करते. OTT अॅप्सबद्दल सांगायचे तर, Vodafone-Idea प्लानमध्ये Zee5 आणि हंगामा म्युझिक सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.

वाचा: अशी चेक करा तुमच्या Android phone ची बॅटरी हेल्थ, वाढवा बॅकअप

Airtel 499 Plan

airtel-499-plan

एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान देखील युजर्ससाठी चांगला आहे. तुम्ही जर अधिक डेटा वापरत असाल तर हा प्लान तुमच्यासाठी चांगला आहे. या पोस्टपेड प्लाननमध्ये दररोज ७५ GB डेटाचा लाभ तुम्हाला मिळेल. तसेच, १०० SMS देखील यामध्ये मिळतील. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय, ओटीटी युजर्ससाठी देखील हा प्लान चांगला आहे. एअरटेलच्या ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शनही दिले आहे.

वाचा: १७ मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा ‘हा’ 5G फोन स्वस्तात न्या घरी, Xiaomi देतेय १०,४०० रुपयांपर्यंतचा ऑफ

Airtel 399 Plan

airtel-399-plan

एअरटेलचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन: तुम्ही जर एअरटेल युजर्स असाल तर कंपनीने तुमच्यासाठी अनेक बेनेफिट्स ऑफर केले आहे. एअरटेलच्या या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लाननमध्ये रोलओव्हरसह 75 GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्याच वेळी, डिस्ने प्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राइम पोस्टपेड प्लॅनमध्ये विनामूल्य सदस्यता देतात. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, एअरटेलच्या स्वस्तात मस्त प्लानमध्ये दररोज १०० MS देण्यात आले आहेत. बजेट युजर्ससाठी हा एक चांगला प्लान आहे .

Jio plans

jio-plans

Reliance जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान: हा कंपनीचा सर्वात लोकप्रिय पोस्टपेड प्लान आहे. जिओच्या या ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये युजर्सना आवडतील असे अनेक फायदे देण्यात येतात. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि क्लाउडचे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते. तसेच, या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंगचा लाभ देखील मिळेल. सोबतच यामध्ये दररोज १०० एसएमएस आणि ७५ GB डेटा उपलब्ध आहे. तसेच, २०० GB डेटा रोलओव्हर सुविधा देखील यामध्ये उपलब्ध आहे.

वाचा: BSNL चा जबरदस्त प्लान, ९० दिवसांपर्यंत डेली २ GB Data, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री OTT ची मजा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here