Airtel 5G Plus या शहरात झाली सुरू

Airtel 5G Plus सर्विसा ला सर्वात आधी देशातील ८ प्रमुख शहरात म्हणजेच दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलिगुडी, नागपूर, आणि वाराणासी या आठ शहरात सर्वात आधी ही सर्विस सुरू करण्यात आली आहे. तर एअरटेल कंपनी आपल्या एअरटेल ग्राहकांना मेसेज पाठवून या संबंधी माहिती देत आहेत.
वाचा: Jio, Airtel Vi च्या ‘या’ स्वस्त प्लान्समध्ये हाय-स्पीड डेटासह Amazon Prime-Netflix मोफत, पाहा लिस्ट
Airtel 5G SIM कसे मिळेल

एअरटेल कंपनी आधीच हे स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या ५जी प्लस सेवेचा लाभ मिळवण्यासाठी एअरटेल ग्राहकांना आपले सिम कार्ड (Airtel 5G SIM) बदलण्याची गरज नाही. कारण, Airtel 4G SIM मध्ये ५जी नेटवर्कचा वापर केला जावू शकतो. म्हणजेच सध्या ५जी सिम कार्डची गरज नाही. तुम्ही जर देशातील ८ प्रमुख शहरातील यूजर्स असाल तर तुम्हाला याचा लाभ मिळू शकणार आहे.
वाचाः iPhone 14 Plus चा सेल आजपासून, खरेदीवर मिळणार ऑफर्स, पाहा किंमत-फीचर्स
Airtel 5G Recharge Plan

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या ४ जी प्लानच्या किंमतीत ग्राहकांना ५जीचा वापर करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही ४जीच्या किंमतीत ५जीची मजा मिळू शकणार आहे. याचाच अर्थ एअरटेलचा सर्वात स्वस्त ५जी रिचार्ज प्लान २४९ रुपयाचा असेल जो ४जी प्लान आहे. यात २ जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा आणि २४ दिवसाची वैधता मिळते.
वाचाः Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro भारतात लाँच, प्री-बुकिंग केल्यास ८५०० रुपयाचा कॅशबॅक
Airtel 5G Plus Speed

कंपनीने दावा केला की, एअरटेल ५जी प्लस मध्ये यूजर्संना आता ३० पट वेगाच्या स्पीडने इंटरनेटचा वापर करता येणार आहे. सोबत कंपनीने एअरटेल ५जी प्लस सर्विसला ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून लाइव्ह सुद्धा केले आहे. म्हणजेच देशातील ८ प्रमुख शहरात एअरटेल ५जी सर्विसचा वापर करता येवू शकणार आहे.
वाचाः गुगलने आणली ECG मोजणारी स्वस्त व सुंदर Pixel Watch; पाहा किंमत
सुपरफास्ट स्पीडने होणार झटपट काम

भारती एअरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ गोपाल विट्टल यांनी एअरटेल ५जी प्लस च्या लाँचिंग दरम्यान माहिती दिली होती. एअरटेल ५जी प्लस आगामी वर्षात लोकांची कम्यूनिकेशन, राहणे, काम करणे, जोडणे, व खेळणे ही सर्व पद्धत बदलता येवू शकणार आहे. कारण, एअरटेल ५जी पल्सने हाय डेफिनिशन व्हिडिओ स्ट्रिमिंग, गेमिंग, मल्टिपल चॅटिंग, फोटोजला तात्काळ अपलोड करण्यासारखे काम सुपरफास्ट स्पीडने करू शकतील.
वाचाः आता १० हजारांनी स्वस्त झाला Samsung Galaxy F23 5G, फोनमध्ये भन्नाट कॅमेरा, मजबूत बॅटरी
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times