व्हाट्सअॅप वेब डार्क मोड
काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये डार्क मोड उपलब्ध करून दिल्यानंतर त्याला युजर्सनी उत्तम प्रतिसाद दिला. आता हा डार्क मोड व्हॉट्सअॅपच्या वेब व्हर्जन म्हणजेच व्हॉट्सअॅप वेबमध्येसुद्धा उपलब्ध झाला आहे. यासाठी व्हाट्सअॅप वेबवर लॉगइन केल्यावर सेटिंग्समध्ये थीममध्ये जाऊन डार्क मोडचा पर्याय निवडावा.
इन्स्टाग्राम रिल्स
इन्स्टाग्रामने नुकतंच १५ सेकंदांपर्यंतचे व्हिडीओ शेअर करण्यासाठी आपल्या अॅप्लिकेशनमध्ये रिल्स हे फिचर उपलब्ध करून दिलं आहे. या फिचरमध्ये नवीन व्हिडीओ रेकॉर्ड करून अपलोड करताना त्यात ऑडिओ, इफेक्ट्स आणि व्हिडीओ स्पीडसुद्धा सेट करता येतो. टाइमर सेट करूनसुद्धा हे फिचर वापरता येतं. यामध्ये आधीच चित्रित केलेले १५ सेकंदांपर्यंतचे व्हिडीओज किंवा जास्त कालावधीच्या व्हिडीओजमधील १५ सेकंदांचा भागसुद्धा अपलोड करता येतो.
फेसबुक अवतार
जुलै महिन्याच्या सुरुवातीला फेसबुकने आपल्या युजर्सना नेहमीच्या डिस्प्ले प्रोफाइल फोटोऐवजी कार्टून अवतारातले फोटो वापरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आपल्या फोटोपासून कार्टून रुप तयार करून ते शेअर करायचं असतं. हे करण्यासाठी आपल्या प्रोफाइलमध्ये जाऊन अवतार हा पर्याय निवडायचा आणि चेहरेपट्टी, केस, चष्मा, नाक आणि इतर फीचर्सशी मिळता-जुळता अवतार तयार करून तो शेअर करायचा. या नव्या अवताराला युजर्सचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
आयजीटीव्ही प्रीव्ह्यू एडीट
इन्स्टाग्रामवर एक नवीन फिचर उपलब्ध झालं आहे. ते म्हणजे व्हिडीओ शेअर करताना प्रीव्ह्यूवर असलेलं कव्हर एडीट करता येतं. ज्यामुळे कव्हरवर असलेला फोटो आपल्यानुसार अॅड्जस्ट करता येतो. यासाठी व्हिडीओ अपलोड करताना एडीट प्रोफाइल कव्हर हा पर्याय निवडावा लागतो.
इन्स्टाग्राम पिन कमेंटस
नेटीझन्सच्या विशेष आवडीच्या इन्स्टाग्राम अॅप्लिकेशनमध्ये आता आणखी एक सुविधा उपलब्ध झाली आहे. इन्स्टाग्रामवर येणाऱ्या कमेंट्सपैकी आपल्याला आवडलेली कमेंट पिन करू शकतो. म्हणजेच पिन केलेली कमेंट वर येते. हे करण्यासाठी कमेंट निवडून डावीकडे स्क्रोल केल्यावर ती पिन करण्याचा पर्याय निवडता येतो.
ट्विटर फ्लीटस
ट्विटरने हल्लीच अॅप्लिकेशनमध्ये युजर्सना आपल्या प्रोफाइलमध्ये फ्लीटस हे फिचर उपलब्ध करून दिलं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीज प्रमाणेच हे फिचर असून या फ्लीटस शेअर केल्यानंतर २४ तासच दिसतात. अन्य युजर्सना फॉलो न करताही त्यांनी शेअर केलेले फ्लीटस बघता येतात. तसंच आपण शेअर केलेले फ्लीटस कोणी-कोणी बघितले हेसुद्धा पाहता येतं. पण, ट्विटर वेब व्हर्जनमध्ये हे फिचर अजून उपलब्ध झालेलं नाही.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times