नवी दिल्लीः शाओमीचा स्मार्टफोन भारतात २० जुलै रोजी लाँच करण्यात येणार आहे. शाओमीने सोमवारी ही माहिती दिली. कंपनीने नुकतीच ही माहिती दिली होती की, हा फोन भारतात लवकरच लाँच करण्यात येणार आहे. आता शाओमीने च्या लाँचिंगची घोषणा केली आहे. शाओमीने एक टीझर जारी केला आहे. परंतु, यात हे स्पष्ट नाही केले की, आगामी फोन हा रेडमी नोट ९ असणार आहे. परंतु, ट्विट करण्यात आलेल्या फोटोत रेडमी आणि नोट ब्रेकिंगसोबत ९ स्पष्टपणे दिसत आहे. फोनला ग्लोबली एप्रिलमध्ये लाँच करण्यात आले होते.

वाचाः

Redmi India ने गेल्या आठवड्यात ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला होता. परंतु, यावेळी लाँचच्या तारखेची माहिती शेअर केली आहे. नोट ९ ला २० जुलै रोजी दुपारी १२ वाजता भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने या कार्यक्रमांसंबंधी कोणतीही माहिती अद्याप दिली नाही. शाओमीने फोनच्या किंमती संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. या फोनच्या किंमतीची माहिती लाँचिंगवेळी जाहीर करण्यात येणार आहे. रेडमी नोट ९ च्या संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहक वेबसाइटच्या ‘Notify Me’ ऑप्शन वर क्लिक करू शकतात.

वाचाः

वायफाय अलायन्स लिस्टिंगवर भारतात येणाऱ्या रेडमी नोट ९ मॉडलचा नंबर M2003J15SI लिस्ट करण्यात आला होता.

रेडमी नोट ९ ची वैशिष्ट्ये
रेडमी नोट ९ स्मार्टफोन ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये येईल. या फोनची किंमत १९९ डॉलर म्हणजेच जवळपास १४ हजार ९०० रुपये किंमत आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २४९ डॉलर म्हणजेच १८ हजार ७०० रुपयात लाँच करण्यात आले होते. भारतात सुद्धा हा हँडसेट याच किंमतीत लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

हा फोन अँड्रॉयड १० बेस्ड मीयूआय ११ वर चालतो. हँडसेटमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2340 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले दिला आहे. रेडमी नोट ९ मध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप आणि होल पंच डिझाइन देण्यात आला आहे. नोट ९ ला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here