नवी दिल्लीः स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचरचे ट्रेंड सध्या खूप चर्चेत आहे. जवळपास सर्वच स्मार्टफोन्स ब्रँड आता आपल्या उत्पादनाला सोबत लाँच करीत आहेत. रियलमी 120W चार्जिंग टेक्नोलॉजी आणि ओप्पो 125W चार्जिंग टेक्नोलॉजीवर काम करीत आहे. आता बातमी येतेय की, विवोचा सब ब्रँड IQOO सुद्धा या रेसमध्ये समावेश झाला आहे. IQOO सुद्धा 120W फास्ट चार्ज टेक्नोलॉजीच्यासोबत स्मार्टफोनसोबत लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी ऑगस्ट मध्ये या टेक्नोलॉजीसोबत नवीन फोन लाँच करू शकते.

वाचाः

५ मिनिटात ५० टक्के चार्ज बॅटरी
रियलमी आणि ओप्पोप्रमाणे IQOO ने सुद्धा 120W फ्लॅश टेक्नोलॉजी आणतेय. या टेक्नोलॉजीच्या मदतीने 4000mAh ची बॅटरी १५ मिनिटात चार्ज होणार आहे. या बॅटरीला ५० टक्के चार्ज करण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागेल. या सुपरफास्ट टेक्नोलॉजीने फोन चार्ज करताना ओव्हरहिटची समस्या उद्भवणार नाही.

वाचाः

iQOO Z1 5G मध्ये 44W फास्ट चार्जिंग
iQOO Z1 5G मध्ये कंपनीने सध्या 44W फास्ट चार्ज टेकचा वापर केला आहे. कंपनीने नवीन चार्जिंग टेक्नोलॉजीत इंटेलिजेंट टेंपरेचर कंट्रोल टेकचा वापर केला आहे. यात ओव्हर हिटिंगचा त्रास होणार नाही.

विवो आणतेय 120W सुपरफास्ट चार्जिंग
IQOO ची पॅरेंट कंपनी विवो ची नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करीत आहे. विवो १२० वॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी घेवून येण्याची तयारी करीत आहे. विवोने गेल्या वर्षी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस मध्ये सुपर फ्लॅश सेल चार्ज टेक्नोलॉजी आणली होती. विवो या टेक्नोलॉजीने केवळ १३ मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होईल.

वाचाः

शाओमी सुद्धा मागे नाही
शाओमी (Xiaomi) ने गेल्या वर्षी मार्च मध्ये आपली 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आणली होती. या टेक्नोलॉजीचा वापर करून 4000mAh ची बॅटरी केवळ १७ मिनिटात फुल चार्ज होईल. परंतु आता पर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, कंपनी कोणत्या फोनमध्ये या टेक्नोलॉजीचा वापर करणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here