5G: भारतात 5G सेवेचा शुभारंभ करण्यात आला असून Airtel आणि Reliance Jio ने भारतातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. रिलायन्स जिओने दिल्ली (एनसीआर), मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथे सेवा सुरू केली आहे. तर, एअरटेलने दिल्ली (एनसीआर), मुंबई, कोलकाता आणि वाराणसी, नागपूर, बंगलोर, हैदराबाद आणि सिलीगुडी येथे एअरटेलची 5जी प्लस सेवा सुरू केली आहे. जर तुम्ही या शहरांमध्ये राहत असाल आणि Airtel किंवा Jio सिम वापरत असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क वापरण्याचा प्रयत्न करत असाल. यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे खूप महत्त्वाचे आहे. पण, जर तुमच्याकडे 5G फोन असूनही तुमच्या फोनमध्ये नेटवर्क येत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही. काही स्टेप्सच्या मदतीने तुम्ही 5G नेटवर्कची उपलब्धता तपासू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो करा.

5g Tower

5g-tower

जर तुमच्या फोनमध्ये 5G सॉफ्टवेअर अपडेट आले असेल आणि तरीही सिग्नल येत नसेल, तर याचा अर्थ असा की तुमच्या क्षेत्रातील 5G टॉवर अजून अपग्रेड झालेले नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नलची उपलब्धता तपासण्यासाठी तीच प्रक्रिया पुन्हा करू शकता. आयफोन युजर्सनी लक्षात ठेवावे की, एअरटेल 5G प्लस सेवा त्यांच्या डिव्हाइसमध्ये येण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे त्यांना Airtel ची 5G सेवा वापरण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाचा: BSNL युजर्सची मजा ! ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये ६० दिवसांपर्यंत डेली अनलिमिटेड इंटरनेटसह बरंच काही

Airtel Users

airtel-users

Airtel 5G

एअरटेल युजर्स या स्टेप्स फॉलो करा: 5G Plus सेवा लॉन्च करण्यासोबतच Airtel ने Airtel Thanks अॅप देखील अपडेट केले आहे. युजर्स या App च्या मदतीने त्यांच्या फोनमध्ये 5G कनेक्टिव्हिटीची उपलब्धता देखील तपासू शकतात. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. स्टेप 1: यासाठी युजर्सना प्रथम Google Play Store वर जाऊन त्यांचा 5G स्मार्टफोन अपडेट करावा लागेल. स्टेप 2: त्यानंतर एअरटेल थँक्स अॅपच्या होम पेजवर जा. तेथे तुम्हाला 5G (5G उपलब्धता) ची उपलब्धता तपासण्याचा पर्याय मिळेल.

वाचा: Best Diwali Gift: दिवाळीत मित्र-कुटुंबियांना गिफ्ट द्या ‘हे’ भन्नाट स्मार्टफोन्स, किंमत बजेटमध्ये, फीचर्स A1

Airtel 5G

airtel-5g

5G उपलब्धता तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या डिव्हाइसची स्थिती आणि शहरातील 5G सेवेची उपलब्धता तपासली जाईल. स्टेप 4: जर तुमच्या फोनमध्ये 5G सेवा उपलब्ध असेल, तर तुमच्या फोनमध्ये एक नोटिफिकेशन येईल, ज्यामध्ये तुम्ही 5G शहरात असे लिहिलेले असेल. त्यानंतर 5G हँडसेट आणि 5G सॉफ्टवेअर तपासले जातील. त्यानंतर तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल येईल. तरीही तुमच्या फोनला 5G सिग्नल मिळत नसल्यास, तुम्हाला कल्पना येईल की तुमच्या फोनमध्ये अद्याप 5G सॉफ्टवेअर अपडेट आलेले नाही.

वाचा: Best Diwali Gift: दिवाळीत मित्र-कुटुंबियांना गिफ्ट द्या ‘हे’ भन्नाट स्मार्टफोन्स, किंमत बजेटमध्ये, फीचर्स A1

Jio 5G

jio-5g

Jio युजर्स या स्टेप्स फॉलो करा: रिलायन्स जिओने आपली 5G सेवा म्हणजेच True 5G सध्या बीटा चाचणीसाठी उपलब्ध करून दिली आहे. या चाचणी दरम्यान, Jio कोणत्याही वापरकर्त्यांना 5G सेवेची चाचणी घेण्यासाठी Random Invitations पाठवत आहे. अशात, जर तुमच्या 5G फोनमध्ये Jio सिम असेल आणि तुम्ही दिल्ली, मुंबई, कोलकाता किंवा वाराणसी येथे रहात असाल, तर तुम्हाला Jio कडून कधीही आमंत्रण मिळू शकते, ते स्वीकारून तुम्ही Jio True ची चाचणी करू शकाल. जिओ सिम असलेल्या आयफोन युजर्सना 5G सेवा वापरण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

5g Signal

5g-signal

तुमच्या फोनला 5G सिग्नल मिळत नाहीये का? भारतातील काही शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली म्हणून स्मार्टफोन युजर्स खूप उत्सुक आहेत. परंतु, बरेच युजर्स 5G वापरू शकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीकडून 5G सपोर्टिंग स्मार्टफोन्समध्ये नवीन अपडेट येणार असून ते अपडेट आल्यानंतरच यूजर्स त्यांच्या फोनमध्ये 5G स्मार्टफोन वापरू शकणार आहेत . अनेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये हे अपडेट्स आले आहेत. त्याच वेळी, 5G नेटवर्क अपडेट अद्याप आयफोनमध्ये आलेले नाही. फोनमध्ये 5G नेटवर्क आहे की नाही हे असे चेक करू शकता.

वाचा : Smartphone सतत Charge करावा लागणारच नाही, फॉलो करा ‘या’ टिप्स, तासनतास वापरा फोन

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here