Flipkart Diwali Sale 2022 : Flipkart Big Diwali Sale आता सर्व युजर्ससाठी लाईव्ह आहे. या सेलमध्ये SBI बँक आणि कोटक बँकेच्या ग्राहकांसाठी १० % ची झटपट सूट दिली जात आहे. तुम्ही या फेस्टिव्ह सिझनमध्ये मिड-रेंज फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक डील असू शकते. Oppo Pixel आणि Motorola सह इतर स्मार्टफोन्सवर चांगल्या ऑफर्स आहेत. विशेष म्हणजे हे स्मार्टफोन्स प्रत्येक युजरला आवडतील असे आहेत.
काहींचा कॅमेरा भन्नाट आहे. तर, काही स्मार्टफोन्सची बॅटरी लाईफ जबरदस्त आहेत. या लिस्टमध्ये Oppo F21s Pro, Realme GT 2, Google Pixel 6a, Motorola Edge 20 Pro ,Samsung Galaxy S22 + सारख्या काही जबरदस्त स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या स्मार्टफोन्सबद्दल त्यावर उपलब्ध ऑफर्स बद्दल सविस्तर जाणून घ्या आणि स्वतःसाठी खरेदी एक भन्नाट स्मार्टफोन.

Motorola Edge 20 Pro

motorola-edge-20-pro

Motorola Edge 20 Pro : Flipkart वर Edge 20 Pro ची किंमत ३०,९९९ रुपये आहे. कंपनीचा हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. अँड्रॉयड १२ ओएस वर काम करणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर मिळेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये रियरमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक ८ मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे.

वाचा : फोनमध्ये Airtel- Jio चे 5G सिग्नल येत नाहीये ? असे करा चेक, पाहा स्टेप्स

Realme GT 2

realme-gt-2

Realme GT 2: Realme GT 2 सध्या Flipkart वर ३०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. Realme GT 2 स्मार्टफोनमध्ये ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनसोबत कंपनी एक चार्जर देत आहे. मात्र, हँडसेट वायरलेस चार्जिंग सपोर्ट करत नाही. यामध्ये मल्टीटास्किंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रगन ८८८ चिपसेटचा सपोर्ट आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

वाचा : Samsung Galaxy S21 FE 5G आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Samsung Galaxy S22 Plus

samsung-galaxy-s22-plus

Samsung Galaxy S22 +: हे प्रीमियम सॅमसंग डिव्हाइस फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये अतिशय कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. हे फ्लॅगशिप डिव्हाइस बँक कार्ड ऑफरसह कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकते. Samsung Galaxy S 22 + मध्ये फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. यासोबतच, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आणि १० मेगापिक्सल टेलिफोटो लेंस आहे. Samsung Galaxy S 22 मध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनचे इतर फिचर्स देखील भन्नाट आहेत.

वाचा: BSNL युजर्सची मजा ! ३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये ६० दिवसांपर्यंत डेली अनलिमिटेड इंटरनेटसह बरंच काही

Google Pixel 6A

google-pixel-6a

Google Pixel 6a: Google Pixel 6a सेलमध्ये ३४१९९ रुपयांच्या सवलतीच्या किंमतीवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. Google Pixel 6a मध्ये तुम्हाला ६० Hz रिफ्रेश रेट, प्लॅस्टिक बॅक आणि साधे डिझाइन असलेली स्क्रीन मिळेल. स्मार्टफोनमध्ये ६.१४ इंच डिस्प्ले आहे. स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात १२.२ M P मुख्य लेन्स आणि १२ M P दुय्यम लेन्स आहेत. फ्रंटमध्ये कंपनीने ८ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाइस Android 12 वर काम करते .

Oppo F21s Pro

oppo-f21s-pro

Oppo F21s Pro : Oppo F21 s Pro ची फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये २७,८९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात विक्री होत आहे. OPPO F21 Pro मध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सारखी अत्याधुनिक टेक्नोलॉजी आहे. या सेगमेंट मध्ये फर्स्ट फ्लॅगशीप सोनी आयएमएक्स ७०९ सेल्फी कॅमेरा सेन्सर दिले आहे. सेगमेंट फर्स्ट २ एमपी मायक्रोलेन्स दिले आहे. Oppo F21 s Pro हा फोन नवीन कलर ओएस १२ सोबत येतो. प्रायव्हसीसाठी एक स्मार्ट नोटिफिकेशन हायडिंग फीचर देण्यात आले आहे.

वाचा: Smartphone सतत Charge करावा लागणारच नाही, फॉलो करा ‘या’ टिप्स, तासनतास वापरा फोन

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here