Best Budget 5G Smartphones Under 15000 : जगातील सर्वात वेगवान नेटवर्क भारतातही आले असून भारतीय युजर्ससाठी 5G ची प्रतीक्षा संपली आहे. त्यामुळे तुम्ही अजून 5G स्मार्टफोन विकत घेतला नसेल, तर तुम्ही तो खरेदी करू शकता. नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे सध्या फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स साइट्स दिवाळीच्या निमित्ताने सेलचे आयोजन करत आहेत. सेलमध्ये 5G स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येत असून सेल दरम्यान अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्सना किमतीत कपात आणि बँक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. सेलमध्ये, Redmi Note 11T 5G, Poco M4 5G आणि Samsung Galaxy M13 वर प्रचंड सूट दिली जात आहे. 5G स्मार्टफोनवरील सर्वोत्तम डीलबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि स्वतःसाठी खरेदी करा बेस्ट 5G स्मार्टफोन.

Poco M4 5G

poco-m4-5g

Poco M4 5G: किंमत – १०,९९९ रुपये

Poco M4 5G मध्ये ६.५८ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल, २०:९ आस्पेक्ट रेशो आणि ९० Hz चा रिफ्रेश रेट आहे. हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करतो. फोनमध्ये Octa core MediaTek MT6833 Dimensity 700 (7 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. समोर ८-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे.

वाचा: बेस्टच ! ५० हजारांचा Xiaomi 11T Pro 5G १५,४४९ रुपयांमध्ये पोहोचेल घरी, पाहा कुठे मिळतेय ऑफर

Realme 9i 5G

realme-9i-5g

Realme 9i 5G: किंमत – १३,४९९ रुपये

Realme 9i 5G मध्ये १०८० x २४०८ पिक्सेल, 90Hz रिफ्रेश रेट आणि २०:९ आस्पेक्ट रेशोच्या रिझोल्यूशनसह ६.६ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये Octa core MediaTek MT6833P Dimensity 810 (6 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या पुढील बाजूस ८-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तर ५० मेगापिक्सल्सचा पहिला कॅमेरा मागील बाजूस देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो.

वाचा: फोनमध्ये Airtel- Jio चे 5G सिग्नल येत नाहीये ? असे करा चेक, पाहा स्टेप्स

Realme Narzo 50 5G

realme-narzo-50-5g

Realme Narzo 50 5G: किंमत – १३,७४९ रुपये

Realme Narzo 50 5G मध्ये ६.६ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४८० पिक्सेल, २०: ९ आस्पेक्ट रेशो आणि ९० Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. फोनमध्ये Octa core MediaTek MT6833P Dimensity 810 (6 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सल, दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सल देण्यात आला आहे. समोर ८-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी ३३ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे.

वाचा: Android Smartphones वापरताना ‘या’ समस्या येत असतील तर, सर्व्हिस सेंटरमध्ये जायची नाही गरज, पाहा ट्रिक्स

Samsung Galaxy M13 5G

samsung-galaxy-m13-5g

Samsung Galaxy M13 5G: किंमत – १०,९९९ रुपये

Samsung Galaxy M13 मध्ये ६.५ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन ७२० x १६०० पिक्सेल आहे, ९० Hz चा रिफ्रेश दर आणि २०:९ चा आस्पेक्ट रेशो आहे. फोनमध्ये Octa core MediaTek MT6833 Dimensity 700 (7 nm) प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 50 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा मागील बाजूस, तर दुसरा कॅमेरा १२ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे, जी १५ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI Core 4 वर काम करतो.

Redmi Note 11T 5G

redmi-note-11t-5g

Redmi Note 11T 5G: किंमत – १४,९९९ रुपये

Redmi Note 11T 5G मध्ये ६.६ -इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २४०० पिक्सेल, २० :९ आस्पेक्ट रेशो आणि ९० Hz रिफ्रेश रेट आहे. हा फोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. यात ऑक्टा कोअर मीडियाटेक डायमेन्सिटी 810 5G (6 nm) प्रोसेसर आहे. Redmi Note 11T 5G च्या मागील बाजुला ५० मेगापिक्सेलचा पहिला कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय ८ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. समोर १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा: Google वर गमतीतही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, जाल थेट तुरुंगात

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here