नवी दिल्लीः भारत सरकारकडून जूनच्या अखेरच्या आठवड्यात ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. यानंतर या अॅप्सला भारतीय युजर्संसाठी गुगल प्ले स्टोर आणि अॅपल प्ले स्टोरवरून हटवण्यात आले. तसेच या अॅप्सचा अॅक्सेस संपूर्णपणे ब्लॉक करण्यात आला आहे. परंतु, भारताच्या या निर्णयावर चीनने नाराजी दर्शवली आहे. नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या अॅप बंदीचा मुद्दा चीनने उपस्थित केला आहे.

वाचाः

नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत चीनने या अॅप्स बंदीचा मुद्दा उपस्थित केला. न्यूज एजन्सी एएनआयला सरकारी सोर्सेजने सांगितले की, डिप्लोमॅटिक लेवलवर चीनसोबत झालेल्या एका बैठकीत चीनने भारताने बंदी घातलेल्या अॅप्सचा मुद्धा उपस्थित केला आहे. आमच्या अॅप्सवर भारताने बंदी का घातली असा प्रश्न विचारल्यानंतर भारताने त्याला उत्तर दिले आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिने भारताने हा निर्णय घेतला असल्याचे भारताने चीनच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.

वाचाः

भारताचे उत्तर
समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने पुन्हा एकदा चीनला सांगितले. देशातील नागरिकांसंबंधीचा डेटा देशासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याची सुरक्षा करणे महत्त्वाचे आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जावू शकत नाही. बंदीचा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा संबंधित घेण्यात आला आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे पाहून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारताने चीनला दिली आहे. २९ जून रोजी बंदी घातलेल्या जास्तीत जास्त अॅप्सला इंटेलिजन्स एजन्सीजने आधीच रेड सिग्नल दाखवला होता, असेही भारताने म्हटले आहे.

वाचाः

अॅप्सवर होते आरोप
बंदी घालण्यात आलेल्या अॅप्सवर अनेकदा युजर्सचा डेटा कलेक्ट करणे, आणि देशाच्या बाहेर पाठवण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, देशाची एकता आणि अखंडता शिवाय युजर्सच्या डेटाची माहिती खासगी ठेवणे हेही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट अंतर्गत ६९ ए अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here